Pune News : पुण्यातील शास्त्रज्ञांनी तयार केले अवघ्या काही मिनिटांत मातीची गुणवत्ता तपासणारे उपकरण

रासायनिक खतांच्या अयोग्य आणि असमतोल वापरामुळे मातीची गुणवत्ता खराब होत असल्याचे दिसून येते
Pune News
Pune Newsesakal
Updated on

Pune News : पाच दशकांपूर्वी, सुमारे 2 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळविण्यासाठी प्रति हेक्टर 54 किलो खत आवश्यक होते. आज, तेच उत्पादन मिळविण्यासाठी आता सुमारे 280 किलो आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अयोग्य आणि असमतोल वापरामुळे मातीची गुणवत्ता खराब होत असल्याचे दिसून येते.

“याचा परिणाम वनस्पतींच्या आरोग्यावर होतो आणि उत्पादकता कमी होते. संपूर्ण माहिती नसताना, शेतकरी खते घालत राहतात, ज्यामुळे केवळ पिकांच्या उत्पादनावरच परिणाम होत नाही उत्तपन्नाट घट देखील होते,” अशी माहिती सीईओ आणि पुणेस्थित प्रॉक्सिमल सॉइलसेन्स टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक डॉ राजुल पाटकर यांनी द बेटर इंडियाला दिली.

तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी त्यांचे सध्याचे शेतीचे व्यवस्थापन आणि त्यानुसार भविष्यात शेतातून येणारे पिक आपल्याला किती नफा देऊ शकते यासाठी पिक घेण्याआधी मातीचे परीक्षण करावे. डॉ. पाटकर असेही सांगतात की भारतातील सध्याच्या माती परीक्षण पद्धती खूप क्लिष्ट आहेत, कारण शेतकऱ्यांना कृषी प्रयोगशाळेत नमुना पाठवावा लागतो, ज्याचे परिणाम दिसण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण करणे फार रटाळवाणे आणि अधीक काळ घेणारे वाटते.

Pune News
Pune News

माती परीक्षणाचा निकाल मिळेपर्यंत, शेतकर्‍यांनी आधीच जमिनीत खते रोवली असतात जेणेकरून ते वेळेवर बियाणे पेरू शकतील. आपल्या भारतात 14 कोटी शेतकरी आहेत, परंतु आपल्याकडे माती परीक्षणासाठी 3,000 प्रयोगशाळासुद्धा नाहीत.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि पेरणीच्या प्रत्येक फेरीपूर्वी माती परीक्षणासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी, डॉ मुकुल सिंग यांच्यासमवेत या शास्त्रज्ञांनी नुकतेच न्यूट्रीसेन्स विकसित केले आहे. त्यांचा दावा आहे की, ही जगातील सर्वात लहान माती परीक्षण प्रणाली आहे, जी पोर्टेबल, परवडणारी आणि वापरण्यास सोपी आहे.

Pune News
ISRO Scientist Honey Trap Case : इस्रोचा शास्त्रज्ञ हनीट्रॅपच्या विळख्यात; वाचा काय आहे प्रकरण

घरच्या घरी ब्लड शुगर लेव्हल चेक करण्याइतकी Soil Testing सोपी आहे का?

डॉ. पाटकर यांचे वय 55 वर्षे असून यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा तंत्रज्ञानावर संशोधन करण्यास सुरुवात केली, जेव्हा ते IIT बॉम्बे येथे PhD करत होते. “मी कृषी पार्श्वभूमीतून आलेला नसलो तरी, इतर विद्यार्थ्यांनी हा विषय न निवडल्याने मी या क्षेत्रात माझे संशोधन करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी, डॉक्टरेट पदवी मिळवण्यापेक्षा माझ्या कामाचा प्रभाव पाडणे अधिक महत्त्वाचे होते,” असे त्या म्हणाल्या.

संशोधनादरम्यान, त्यांना असे आढळून आले की रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजणे ग्लुकोमीटरच्या साहाय्याने किती सोपे झाले आहे. मग तसेच काहीसे उपकरणा मातीची गुणवत्ता पडताळणीसाठी का तयार होऊ शकणार नाही? हा विचार त्यांच्या डोक्यात येताच त्यांनी ग्लुकोमीटर सारख्या इलेक्ट्रो-केमिकल आधारित तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली.

Pune News
Innovation : शहरातील ‘ब्लॅक स्पॉट डिडक्शन’ शक्‍य; राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थ्यांचे यश

एका दशकाहून अधिक संशोधनानंतर, 2022 च्या सुरुवातीला या उपकरणाचा पहिला नमुना बनवण्यात ते सक्षम झाले. “NutriSens हे एक लहान हार्डवेअर उपकरण आहे जे PH, विद्युत चालकता, नायट्रेट, यांसारखे सहा पॅरामीटर्स तपासण्यासाठी पेपर-आधारित सेन्सर स्ट्रिप्ससह तयार करण्यात आले आहे. असे डॉ. पाटकर सांगतात. (Innovation)

Pune News
World Soil Day : केसांचं सौंदर्य वाढवायचंय? वापरा शॅम्पू ऐवजी माती

हे उपकरण कसे कार्य करते याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणतात की अर्धा किलोचे नमुने दूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याच्या पारंपारिक पद्धतींप्रमाणे चाचणी करण्यासाठी ते फक्त शेतात नेले जाऊ शकते. “एक ग्रॅम मातीचा नमुना घ्या, एका लहान कुपीमध्ये 3 मिली एजंट सोल्यूशन ठेवा, ते हलवा आणि स्पष्ट द्रावण दिसेपर्यंत माती स्थिर होण्यासाठी अर्धा तास सोडा. सेन्सरवर त्यानंतर त्यावर सोल्यूशनचा एक थेंब टाका. त्या सांगतात की “आम्हाला सर्व सहा पॅरामीटर्ससाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात निकाल मिळतात. प्रत्येक पॅरामीटर मोजण्यासाठी 25-30 सेकंद लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.