Pune : आत्मनिर्भरता ही संरक्षण क्षेत्राच्या भविष्याची गुरु किल्ली

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ; मिलिटचा डीएसटीएससी आभ्यासक्रम पूर्ण
pune
puneSakal
Updated on

पुणे - आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देण्यासाठी त्यास खऱ्या अर्थाने साध्य करण्यासाठी तिन्ही दलातील अधिकाऱ्यांनी यासाठी योगदान देण्याची गरज आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन ही काळाची गरज झाली असून तीच भविष्याची गुरू किल्ली आहे. असे मत एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाचे (एचक्यू आयडीएस) एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी व्यक्‍त केले.

येथील गिरीनगरमधील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) येथे आयोजित डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सच्या (डीएसटीएससी) समारोप कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी मिलिटचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल व्ही राजशेखर व इतर वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आदी उपस्थित होते.

श्रीलंकेच्या चार अधिकाऱ्यांसह भारतीय सशस्त्र दलाच्या एकूण १६३ अधिकाऱ्यांनी हा डीएसटीएससी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केली. कमांड आणि स्टाफ नियुक्त्यांसाठी मध्यम-स्तरीय अधिकारी तयार करण्याकरिता सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसाठी डीएसटीएससी अभ्यासक्रम आयोजित केला जातो.

pune
Mumbai-Pune Express way Accident News: दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात

यावेळी एअर मार्शल मिश्रा म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाच्या या जगात सुरक्षेच्या अनुषंगाने सशस्त्र दलांमध्ये नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी योग्यपणे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना तयार करण्यावर भर द्यावा.

सशस्त्र दलांमध्ये स्वदेशी उपकरणांचा योग्य समावेश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशिष्ट तंत्रज्ञानाशी सतत परिचित राहण्याची गरज आहे. दरम्यान डीएसटीएससी बाबत म्हणायचे झाले तर, समकालीन तांत्रिक प्रशिक्षणासोबत अधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी विषयांवर प्रशिक्षण देण्याचा मिलिटचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’ तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना मिलिटमधून मिळालेल्या प्रशिक्षणाचा व तांत्रिक ज्ञानाचा देशाच्या सुरक्षेसाठी उपयोग करण्याचा सल्ला ही दिला.

यावेळी अभ्यासक्रमा दरम्यान उत्तीर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सैन्यदलात मेजर अभिनव शर्मा, नौदलात कमांडर आलोक साहू तर हवाई दलात स्क्वॉड्रन लिडर जे.सतीश कुमार यांनी कोर्स दरम्यान गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच तिन्ही दलातील अधिकाऱ्यांमध्ये संयुक्तपणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पर्पल ट्रॉफी’ स्क्वॉड्रन लिडर जे. सतीश कुमार यांना प्रदान करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()