लेखन, संकलन, संपादन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव (वय ७५) यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. त्या दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
वीणा देव यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९४८ चा. गो. नी. दांडेकर यांच्यामुळे त्यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. पुढे १९६७ मध्ये त्यांचा विवाह डॉ. विजय देव यांच्याशी झाला. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.