Pune : सेट परीक्षेची घोषणा २६ मार्च २०२३ ला पार पडणार

विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाणारी
Set Exam
Set ExamSakal
Updated on

पुणे : राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात सेटची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २६ मार्च २०२३ रोजी ३८ वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची यंदाची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सहायक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी १९९३ पासून ही परीक्षा घेतली जाते. दरवर्षी साधारणतः सहा टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात. उमेदवार सहायक पदासाठी पात्र तर ठरतो, मात्र प्रत्यक्ष प्राध्यापक भरती रखडल्यामुळे त्याला मनस्तापच सहन करावा लागतो.

‘सेट’बद्दल.

पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण आवश्यक (राखीव ५० टक्के). शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

- परीक्षेचे स्वरूप ः वस्तुनिष्ठ बहुपर्यायायी पद्धत. एकूण दोन पेपर घेतले जातात. पेपर १ आणि पेपर २ मधील सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक असते.

माध्यम : इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत उपलब्ध

महत्त्वाचे

- अर्ज करण्याची अंतिम मुदत ः ३० नोव्हेंबर

- विलंब शुल्कासह ः ७ डिसेंबर

- परीक्षेची तारीख ः रविवार, २६ मार्च २०२३

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ ः https://setexam.unipune.ac.in/

मागील सेट

३७ वी सेट परीक्षा

तारीख ः २६ सप्टेंबर २०२१

एकूण उमेदवार ः ७९,७७४

उत्तीर्ण झालेले ः ५,२९७

उत्तीर्णांची टक्केवारी ः ६.६४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.