Pune : महागडी गाडी, मोबाईल खडकवासला धरणाजवळ सोडून दोन दिवसांपासून शेअर ब्रोकर बेपत्ता

करोडो रुपये अडकल्याने शेकडो गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला; हवेली पोलीसांचा सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू
pune
pune sakal
Updated on

किरकटवाडी - महागडी कार, मोबाईल खडकवासला धरणाजवळ सोडून शेअर ब्रोकर व ट्रेडींग करणारा व्यावसायिक दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबियांसह शेकडो गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. निरंजन नवीनकुमार शहा (वय 43, रा. आसावरी, नांदेड सिटी, सिंहगड रोड.) असे संबंधित व्यावसायिकाचे नाव आहे.

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे स्वतः याबाबत तपास करत असून अद्याप कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. सर्व शक्यता पडताळून हवेली पोलीस तपास करत आहेत.

दि. 3 ऑक्टोबर रोजी निरंजन शहा घरातून गेले होते. दुपारी वारजे येथील कार्यालयातून बाहेर बाहेर पडले परंतु घरी आले नाहीत. फोन बंद असल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली परंतु ते आढळून आले नाहीत. त्यांची कार खडकवासला धरण चौपाटीजवळ आढळून आली.

pune
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

त्यात त्यांनी लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली आहे. 'शेअर मार्केटमध्ये मी लॉस झालो असून खुप नुकसान झाले आहे. ज्यांचे पैसे घेतले ते सगळे जवळचे मित्र, नातेवाईक असून त्यांना मी उत्तर देऊ शकत नाही. मी आत्महत्या करत आहे. यात कोणाचाच दोष नसून कोणालाही जबाबदार धरु नये. पत्नी,आई, मुलांनो मला माफ करा', वगैरे मजकूर त्या चिठ्ठीत आहे.

pune
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

त्यात त्यांनी लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली आहे. 'शेअर मार्केटमध्ये मी लॉस झालो असून खुप नुकसान झाले आहे. ज्यांचे पैसे घेतले ते सगळे जवळचे मित्र, नातेवाईक असून त्यांना मी उत्तर देऊ शकत नाही. मी आत्महत्या करत आहे. यात कोणाचाच दोष नसून कोणालाही जबाबदार धरु नये. पत्नी,आई, मुलांनो मला माफ करा', वगैरे मजकूर त्या चिठ्ठीत आहे.

हवेली पोलीसांनी तातडीने अग्निशमन दलाच्या मदतीने खडकवासला धरण परिसरात निरंजन शहा यांचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. चौपाटीवरील विक्रेत्यांकडे विचारणा केली मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. शहा यांचे कुटुंबीय व ज्यांचे करोडो रुपये अडकलेत असे अनेक गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

pune
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

शेवटच्या दिवशी घेतले तब्बल 81 लाख ज्या दिवशी पासून निरंजन शहा बेपत्ता आहेत त्या दिवशी सकाळी त्यांनी बारामती येथील एका गुंतवणूक दाराकडून तब्बल 81 लाख रुपये घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. निरंजन शहा यांच्याकडे अशाप्रकारे अनेक गुंतवणूकदारांनी जास्त परताव्याच्या हव्यासापोटी मोठी गुंतवणूक केलेली असून हा आकडा पन्नास कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. पोलीस तपासातून यातील तथ्य समोर येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.