बहिण-भावाची शेवटी भेट झालीच नाही!

भरधाव पुढे गेलेली शिवशाही बस तितक्‍याच वेगाने अचानक माघारी वळली, काही कळण्यापुर्वीच महिला बसच्या चाकाखाली येऊन गतप्राण झाली.
Gendabai Chaugule
Gendabai ChauguleSakal
Updated on

पुणे - आजारी असलेल्या लहान भावाला भेटण्यासाठी 60 वर्षांची बहिण तिची मुलगी व नातेवाईकांना घेऊन सोलापुरहून (Solapur) पुण्याला (Pune) आली. एसटी स्थानकात उतरली, त्यानंतर स्वच्छतागृहातून ती पुन्हा एसटी स्थानकात बसलेल्या मुलीकडे परत येत होती. तेवढ्यात भरधाव पुढे गेलेली शिवशाही बस (Shivshahi Bus) तितक्‍याच वेगाने अचानक माघारी वळली, काही कळण्यापुर्वीच ती महिला बसच्या चाकाखाली येऊन गतप्राण (Death) झाली. आणि नियतीने त्या बहिण- भावंडांची भेट होऊनच दिली नाही! अवघ्या दोन दिवसांवर राखीपौर्णिमा सण आलेला असतानाच दोन भावंडांची कायमची ताटातुट झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली.

गेंदाबाई ज्ञानोबा चौगुले (वय 60, रा. केगाव, सोलापुर) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. भानुदास वाडकर (रा. लातुर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी राणी इगवे (वय 35) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेंदाबाई यांचा भाऊ मोशीमध्ये राहतो. तो काही दिवसांपासून आजारी असल्याने त्या आपल्या भावाला भेटण्यासाठी पुण्याला आल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी राणी व काही नातेवाईक होते.

Gendabai Chaugule
पुणे : शिक्षकांविनाच चालताहेत रात्रशाळा!

बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते सोलापुरहून पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकात आले होते. त्यानंतर त्यांना मोशी येथे भावाकडे जायचे होते. एसटीतुन उतरल्यानंतर गेंदाबाई एसटी स्थानकातील स्वच्छतागृहात गेल्या. तेथून त्या माघारी येत असताना भरधाव शिवशाही बस (एमएच 06, एस. 9485) एसटी स्थानकात आली. तेव्हा गेंदाबाई या शिवशाही बसच्या पाठीमागून एसटी स्थानकात बसलेल्या मुलीकडे जात होत्या. तेवढ्यात भरधाव पुढे गेलेली शिवशाही बस अचानक तितक्‍याच वेगात पाठीमागे आली. त्याचवेळी गेंदाबाई या बसच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे गेंदाबाई यांची आपल्या आजारी भावाला भेटण्याची इच्छा मात्र अपुरीच राहीली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()