Pune: अखेर सिंहगड उड्डाणपुलाचे होणार उद्घाटन; अजितदादांची असणार उपस्थिती, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम!

Ajit Pawar: 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात वाजता उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
 अखेर सिंहगड उड्डाणपुलाचे होणार उद्घाटन; अजितदादांची असणार उपस्थिती, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम!
Pune:sakal
Updated on

Pune : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असलेला सिंहगड रस्त्यावरील राजारामपुल येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

सिंहगड रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता उड्डाणपूल लवकरात लवकर खुला करावा याबाबत 'सकाळ'ने आवाज उठवत पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात वाजता उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

 अखेर सिंहगड उड्डाणपुलाचे होणार उद्घाटन; अजितदादांची असणार उपस्थिती, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम!
काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी'

सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून; सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता. दोन टप्प्यात करण्यात आलेला या पुलाचे एका भागातील काम पूर्ण झाले आहे, तरीही पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता.

सप्टेंबर 2021 पासून या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल जुलै महिन्यातच बांधून तयार झाला होता.

 अखेर सिंहगड उड्डाणपुलाचे होणार उद्घाटन; अजितदादांची असणार उपस्थिती, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम!
Pune Land Acquisition: पुण्यातील भूसंपादन प्रकरणाचा वाद काय? कोर्टानं लाडकी बहीण योजनेचा का केला उल्लेख, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पावसामुळे डांबराचा शेवटचा पन्नास मिलिमीटरचा थर देता आला नव्हता. परिणामी पूल वाहतुकीसाठी खुला केला नाही. पाऊस थांबल्यानंतर, डांबराचा प्लांट बंद आहे, खडी ओली आहे, अशी विविध कारणे पुल खुला करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र उड्डाण पुलावर डांबरीकरण करण्यात आले. यासोबतच उड्डाण पुलावरील रंगकाम, रस्त्यावरील पांढरे पट्टे आखणे, दुभाजक रंगवणे, दिशादर्शक फलक लावणे, ही देखील कामे करण्यात आली. दरम्यान उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले होते; यावर विरोधी पक्षाने आंदोलन देखील केले. नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेता उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पूल खुला करण्यात येणार आहे.

 अखेर सिंहगड उड्डाणपुलाचे होणार उद्घाटन; अजितदादांची असणार उपस्थिती, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम!
Pune News: कमला नेहरू हॉस्पिटलमधील संशयास्पद तरुण पोलिसांच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.