Pune Sinhgad Road Traffic : वाहतूक कोंडीतून नेमकी सुटका कधी आणि कशी ?

सिंहगड रस्ता वासियांना सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले.
Pune Sinhgad Road Traffic
Pune Sinhgad Road TrafficSakal
Updated on

सिंहगड रस्ता : वाहतूक कोंडी सिंहगड रस्त्याच्या पाचवीलाच पुजली असल्याचा प्रत्यय नागरिकांना दररोज येत आहे प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यात असलेली उदासीनता या सगळ्या कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

शुक्रवारी सिंहगड रस्ता वासियांना सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. केवळ विभागीय समन्वयाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवार(दिनांक 31 मे ) रोजी राजाराम पूल येथे करण्यात आलेले खड्डे , विश्रांती नगर येथे बंद पडलेला मालवाहू ट्रक,

तसेच नादुरुस्त असलेला दुसरा ट्रक आणि बंद पडलेली पी एम पी बस या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सिंहगड रस्त्याला सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. जेव्हापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत तेव्हापासून सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Pune Sinhgad Road Traffic
Pune Traffic : नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारावर वारंवार कोंडी;अरुंद रस्ता, अवजड वाहनांमुळे समस्या

उड्डाणपुलाच्या कामापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही; कोणतेही रस्ते उपलब्ध करून दिले गेले नाही. परिणामी वाहतूक कोंडी दररोज अनुभवावी लागली. पुलाच्या कामादरम्यान वीज वितरण कंपनीच्या केबलचे नुकसान झाले होते ते काम महापालिकेच्या विद्युत विभागाकडे सांगण्यात आले.

विद्युत विभागाकडून या कामाची माहिती संबंधित पुलाच्या ठेकेदाराकडे सोपविण्यात आली. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याला 'बॉटल नेक' तयार झाला आणि सकाळी साधारण साडेआठ पासून दुपारी बारा वाजेपर्यंत मुख्य सिंहगड रस्ता आणि कालवा रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

Pune Sinhgad Road Traffic
Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातानंतर अनधिकृत बारवरील कारवाई मंदावली... राजकीय आश्रय असल्याने टाळाटाळ?

एकाच दिवशी अनेक घटना घडल्यामुळे सिंहगड रस्ता वासियांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले सोबतच पर्यायी रस्ते नसल्याने त्यात भर पडली. 

- किरण काळोखे (नागरिक)

सिंहगड रस्त्याला दररोज वाहतूक कोंडी होते. रोज नवीन कारणामुळे ही वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन समोर येऊन काम करत नाही. सिंहगड रस्ता वासियांना नेहमीच वाऱ्यावर सोडले जाते. 

-दिलीप कुलकर्णी (नागरिक) 

ऑफीसला वेळेत पोहचण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. वरून उन्हाच्या झळा सोसत आहोत. सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंत आनंद नगर ते राजाराम पूल 1.5 किलोमीटर अंतर पार करायला 1 तास लागत आहे. राजाराम पुला जवळ केबल टाकणयासाठी खोदलेले तीन छोटे खड्डे, बुजविण्याच्या कामा साठी वेळ नाही. मग कामं घेता कशाला?

-अश्विन शिंदे (अध्यक्ष, रिझन ट्राफिक फाउंडेशन)

छोट्या-छोट्या उपायांची अंमलबजावणी केली तर वाहतूक कोंडी सोडवण्यात काही प्रमाणात यश मिळू शकते परंतु सर्व स्तरावरील उदासीनतेमुळे या गोष्टी केल्या जात नाही. 

-राजकुमार बरडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग सिंहगड रस्ता)

राजाराम पुलाच्या जवळ असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. शहराकडे डबल माती घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला थांबवून हे खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजवून घेतले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अशी कामे करण्यासाठी वाहतूक विभागाला पूर्व कल्पना देणे आवश्यक होते. 

वाहतूक कोंडीची ठिकाणे विठ्ठलवाडी कमान ते राजाराम पूल

  • हिंगणे चौक ते विश्रांती नगर. 

  • माणिक बाग पेट्रोल पंप ते आप्पासाहेब मोरे चौक

  • आनंद नगर चौक पूर्वी सुमारे 200 मीटर

  • राजाराम पूल :- येथे महावितरणच्या केबल साठी खोदण्यात आलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी झाली. राजाराम पूल  :- हे खड्डे पोलिसांनी बुजवून घेतले.

  • हिंगणे चौक :-  येथे बंद पडलेली पी एम पी ची बस

  • विश्रांती नगर :-  येथे सिमेंट मिक्सर ट्रकचा टायर फुटल्याने रस्त्याला वाहतूक कोंडी झाली. 

  • कालवा रस्ता :-  येथे एका ट्रक मधील डिझेल संपल्याने ट्रक जागीच थांबला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

तीन खड्डे आणि तीन बंद पडलेली वाहने यामुळे आज सिंहगड रस्त्याला वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेनुसार या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर संपवण्यात यावे.

तसेच वाहतूक नियमन संदर्भात असणारे फलक लावण्यात यावे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी सिंहगड रस्ता आणि दत्तवाडी वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.