Pune Accident : फोनवर बोलताना दुचाकी आदळली दुभाजकावर; डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी जवळील घटना
pune sinhgad road accident youth using phone on vehicle dies police hospital
pune sinhgad road accident youth using phone on vehicle dies police hospital sakal
Updated on

किरकटवाडी : दुचाकी चालवताना फोनवर बोलणे एका एकोणीस वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले असून गाडी दुभाजकावर आदळून डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश सुरेश ननावरे (वय 19, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी (एन डब्ल्यू ए) जवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही‌ धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश ननावरे हा तरुण किरकटवाडी येथील त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो परत जात असताना राष्ट्रीय जल अकादमीजवळ त्याला फोन आला असता त्याने फोन उचलून बोलणे सुरू केले.

pune sinhgad road accident youth using phone on vehicle dies police hospital
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

पाऊस सुरू असल्याने व रस्त्यावर पथदिवे नसल्याने फोनवर बोलण्याच्या नादात दुचाकी दुभाजकावर आदळली व प्रथमेश जोरात रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच बेशुद्धावस्थेत पडला होता.

pune sinhgad road accident youth using phone on vehicle dies police hospital
Pune Accident : ओतूर येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह पदचारी तरूणी ठार

अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार सचिन कदम, प्रविण ताकवणे व मकसुद सय्यद हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. प्रथमेशला उपचारांसाठी किरकटवाडी फाट्याजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.