पुणे - उद्योग आणि वाहनांच्या प्रदूषणाने (Pollution) दरवर्षीच राजधानी दिल्लीचा (Delhi) जीव गुदमरतो. आता त्यात भर पडली आहे ती पंजाब, हरियानातील प्रदूषणाची! येथील शेतकरी भाताच्या काढणीनंतर उर्वरित पेंढा (पराली) आणि जैविक कचरा (Garbage) जाळतात. यातून निर्माण झालेला कार्बनयुक्त धूर दिल्लीच्या वातावरणात (Environment) जमा होते. दिल्लीच्या या प्रदूषणावर आता पुणेरी उपाय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात, थर्मल प्लाझ्माच्या साहाय्याने भाताच्या साळीतील कचऱ्याद्वारे सिलिकॉन कार्बाईड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विकास मठे आणि प्रा. सुधा भोरास्कर यांच्या नेतृत्वात डॉ. चिती टन्क करण आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. किसन कोडम यांच्या नेतृत्वात डॉ. विनोद नांद्रे यांनी हे संशोधन केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, संरक्षण आदी क्षेत्रात सिलिकॉन कार्बाईडच मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
संशोधनाचे फायदे
स्वस्त आणि सहज पद्धतीने सिलिकॉन कार्बाईडचे नॅनोपार्टीकल मिळतात
कच्चा माल म्हणून भाताच्या जैविक कचऱ्याचा वापर
शेतीपूरक उत्पादनाचा नवीन पर्याय उपलब्ध होईल
जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरणपुरक पर्याय उपलब्ध
पंजाब हरियानात मोठ्या प्रमाणावर असे प्रकल्प उभारल्यास दिल्लीतील प्रदूषणात घट होईल
काय आहे थर्मल प्लाझ्मा?
पदार्थाची चौथी मूलभूत अवस्था म्हणजे प्लाझ्मा होय. एक प्रकारचा प्रचंड तापमानाला तयार झालेला वायु, ज्यात कणांचे आयणीकरण झालेले असते. प्रयोगात वापरलेल्या प्लाझ्मा ज्योतीचे बाह्य भागाचे तापमान एक ते दोन हजार अंश सेल्सिअस असते तर केंद्राचे तापमान ६ ते १० हजार अंश सेल्सिअस असते.
थर्मल प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा कृषी पूरक व्यवसायांसाठी उपयोगी असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. भाताच्या साळीपासून मिळणाऱ्या कचऱ्यातून सिलिकॉन कार्बाईड मिळत असल्याचे पक्के झाले असून, आता अधिक जैविक कचऱ्यावर आम्ही चाचणी घेणार आहे. आता हे संशोधन प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर कसे करता येईल. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
- डॉ. विकास मठे, प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
जागतिक स्तरावरील सिलिकॉन कार्बाईडच बाजारपेठ
वर्ष - मूल्य (कोटी यूएस डॉलरमध्ये)
२०२० - ७४.९
२०२५ (अपेक्षीत) - १८१.२
(स्रोत - मार्कस्टॅन्डमार्केट रिसर्च)
काय आहे संशोधन?
संशोधकांनी थर्मल प्लाझ्माची ज्योत मिळविण्यासाठी प्लाझ्मा रिॲक्टरचा वापर करण्यात आला. या रिॲक्टरमध्ये प्लाझ्मा ज्योतीवर भाताचा साळीपासून मिळणारा जैविक कचरा ठेवला तर त्याची क्षणार्धात राख होत. याच राखेत सिलिकॉन कार्बाईडच नॅनोपार्टीकल मिळतात. यावेळी उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मिश्रित वायूंचाही पुनर्वापर करणे शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.