Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Pune Court Summons Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. येत्या २३ ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
congress rahul gandhi america usa visit politics
congress rahul gandhi sakal
Updated on

Pune Court Summons To Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना 23 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. विनायक दामोदर सावरकर यांची नात सात्यकी अशोक सावरकर यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये दिलेल्या वक्तव्यावर सावरकरांच्या नातीने आक्षेप घेतला आहे.

परदेश दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याविरोधात सात्यकी कोर्टात पोहोचल्या. तेथून आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींयांना माहीत असलेल्या कारणांमुळे अनेक वर्षांपासून सावरकरांची वारंवार बदनामी आणि अपमान करत आहेत. अशाच एका प्रसंगी 5 मार्च 2023 रोजी जेव्हा राहुल गांधी युनायटेड किंगडममधील ओव्हरसीज काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करत होते , त्यांनी हेतुपुरस्सर सावरकरांवर आरोप केले. हे आरोप खोटे आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे आणि 'सावरकर' आडनाव बदनाम करणे आणि त्यांच्या भावना दुखावण्याच्या विशिष्ट हेतू आहे.

congress rahul gandhi america usa visit politics
Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

27 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील न्यायालयाने सावरकरांवरील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना नोटीसही बजावली होती. हे प्रकरण नोव्हेंबर 2022 मध्ये दिलेल्या निवेदनाशी संबंधित आहे. सावरकरांच्या प्रतिमेला जाणीवपूर्वक हानी पोहोचवल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.

सावरकरांवरील काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. भाजपने राहुल गांधींवरही अनेकदा टीका केली आहे. अलीकडेच कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सावरकर मांसाहार करायचे, ते गोहत्येच्या विरोधात नव्हते, असा दावा केला. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे लोक सावरकरांचा वारंवार अपमान करत आहेत.

कर्नाटकच्या मंत्र्याने दिलेल्या वक्तव्यावर शिवसेनेनेही आक्षेप घेतला होता. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.