पुणे : कामावर हजर झालेल्या एसटीचालकावर खोटे आरोप

राजकीय पक्षाच्या पदाधिका-याचा प्रताप, नंतर दिलगीरी व्यक्त, एसी प्रशासन व पोलिसांचा वेळ वाया
खोटे आरोप
खोटे आरोप Sakal
Updated on

भोर (पुणे) : एसटीच्या विभागीय नियंत्रकांशी चर्चा झाल्यानंतर तालुक्यात मंगळवारी (ता.7) दुपारी एसटी सुरु झाली. चार वाहक आणि चार चालक कामावर हजर झाले. मंगळवारी भोरहून कोर्ले, शिरवळ, म्हसर व टिटेघर येथे एसटी रवाना करण्यात आल्या. मात्र सायंकाळी शिरवळ एसटीचा चालकाने मद्यपान केलेले असून तो गाडी वेड्यावाकड्या पध्दतीने चालवित असल्याची तक्रार एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने पोलिसांना केली.

परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी आगार व्यवस्थापक युवराज कदम यांच्याशी संपर्क साधला. आणि चालकाला ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली. चालकाने मद्यप्राशन केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय संबंधीत एसटीचालक याची सेवा केवळ तीन-चार वर्षे राहिलेली आहे. त्यानंतर मात्र संबंधीत तक्रारदाराने माफी मागीतली. परंतु पोलिस आणि आगार व्यवस्थापक यांना काही तास नाहक त्रास सहन करावा लागला.

खोटे आरोप
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या : हर्षवर्धन पाटील

एक महिन्यानंतर एसटी सुरु झाली असून चालकाचा आणि एसटी महामंडळाची बदनामी केल्याबद्दल संबंधीत राजकीय पक्षाच्या पदाधिका-यावर रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.