पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप एकीकडे सुटण्याची चिन्हे दिसेनात. तर दुसरीकडे रविवारी शहरातून एसटीच्या १३९ एसटी बसगाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. रविवारी सुमारे साडेचार हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.
राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य करून, पगार वाढ केल्यानंतरही राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच आहे. दरम्यान, एसटी महामंडळानेही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. रविवारी शिवाजीनगर येथून नाशिकसाठी १५, तर औरंगाबादसाठी ११ बस सोडण्यात आल्या.
पुणे स्टेशन येथून दादरसाठी २३ बसगाड्या सोडल्या तर स्वारगेट एसटी आगारातून दादरसाठी ६, ठाण्यासाठी १०, सांगलीसाठी १०, मिरजसाठी ४, बारामती १६, कल्याण ४, सातारा १२, महाड १, पिंपरी चिंचवड येथून नाशिकसाठी २, दौंडसाठी १० अशा १३९ बस सोडण्यात आल्या. त्यातून चार हजार ५०९ प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान शिवशाही ९०, शिवनेरी ३९, परिवर्तनमधून १० गाड्या सोडल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, वाकडेवाडी येथे एसटी कामगारांचा संप सुरुच होता. त्यामध्ये कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शासनाने विलीनीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.