Pune : राज्य सरकारने दूध बाजार भाव वाढ न केल्यास मुंबई येथे मंत्रालयावर धडक मोर्चा

मागणी मान्य होईपर्यंत मुंबईतच मुक्काम:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांचा इशारा
Pune NEWS
Pune NEWSESAKAL
Updated on

मंचर : “अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायावर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थकारण दुध व्यवसायावर अवलंबून आहे. दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यसरकारने दूध उत्पादकशेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने दूध दरवाढीचा निर्णय घ्यावा. दरवाढीचा प्रश्न मार्गी न लागल्यास मुंबईमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढून निर्णय होईपर्यंत तिथेच आंदोलन करू.” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेपुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

Pune NEWS
Career Tips : नवीन ठिकाणी जॉब करताना मनात एंग्जायटी निर्माण होते? मग, ‘या’ पद्धतीने करा हॅंडल

पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील श्रीराम दुध उत्पादक सहकारी संस्थे समोर दुधाचे बाजारभाव कमी झाल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.४) रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी वनाजी बांगर, संतोष गावडे, प्रकाश कोळेकर, संजय पालेकर, संतोष पवार, तुकाराम गावडे, धोंडीभाऊ गावडे, अंकुश गावडे, सुदाम पोखरकर, पोपट गावडे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Pune NEWS
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

प्रभाकर बांगर म्हणाले “दुधाच्या दराचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये शासन निर्णय पारित करून समिती स्थापन केली होती. शासन निर्णयाचा तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार होता. परंतु अद्याप आढावा घेतला नाही. खाजगी व सहकारी दूध संघांनी दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यास सुरुवात केली आहे जिल्हा दूध संघाने 3.5 फॅट व ८.५ एसएनएफ ला प्रति लिटर दुधाला २६ रुपये बाजारभाव जाहीर केला आहे. खाजगी संघांनी देखील कमी झालेल्या प्रत्येक पॉईंटला मोठ्या प्रमाणात कपात करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने तातडीने शासन निर्णयाप्रमाणे प्रती लिटर ३४ रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना द्यावा. ज्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.”

Pune NEWS
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

“सरकारने एक लिटर दुधाला पाच ते सात रुपये इतके अनुदान द्यावे. कारण सरकारच्या राहुरी कृषी विद्यापीठाने गाईच्या एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च ४२ ते ४३ रुपये इतका दाखवला आहे. एक लिटरचा उत्पादन खर्च जर एवढा असेल तर प्रती लिटर २६,२७,२८ रुपये बाजारभाव घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय कसा करायचा? शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक पैसा देखील राहत नाही. शेतकऱ्यांना दुध व्यवसाय तोट्यामध्ये करावा लागत आहे. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होऊन या भागात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचा धोका आहे. शासनाने दुधाचे दरवाढीबाबतवेळीच सकारात्मक निर्णय घ्यावा”

- प्रभाकर बांगर, पुणे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव): सरकारने दुधाचे बाजारभाव कमी केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.