Pune Station : पुणे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांकडून नागरिकांची होतेय लूट

प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रवासी रिक्षांना परवानगी प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी दिली आहे, असा प्रश्न वारंवार पुणेकरांना पडल्याशिवाय राहत नाही.
Pune Station Rickshaw
Pune Station RickshawSakal
Updated on

कॅन्टोन्मेंट - प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रवासी रिक्षांना परवानगी प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी दिली आहे, असा प्रश्न वारंवार पुणेकरांना पडल्याशिवाय राहत नाही. पुणे रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात किंवा अव्वाच्या सव्वा भाडे घेतात, याची कोणी तक्रार करत नाही, कारण दूरचा प्रवास करून लेकराबाळांना घेऊन आलेली मंडळींना घरी पोहोचण्याची घाई झालेली असते. पोलिसांकडे गेले, तर दाद मिळत नाही, असा अनुभव रेल्वे स्टेशन परिसरातील महिला प्रवासी सुशीला गोडबोले यांनी बोलवून दाखविला.

मंगळवार पेठ, स्वारगेट, कोंढव्यात जाण्यासाठी थेट दीडशे रूपये भाडे सांगतात, पोलीस जवळ असून, त्यांची भीती रिक्षाचालकांना राहिली नाही. बहुतेक रिक्षाचालकांकडे गणवेश, लायन्स-बॅच, परमिट नाही, अशी मंडळी पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षा चालवित आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शहरातील कोणत्याही परिसरात जा रिक्षाचालकांकडून अडवणूक ठरलेलीच आहे, असाच अनुभव पुणेकरांना येत आहे. ओला-उबेर चांगली सेवा देत आहे, तशी तुम्ही का देत नाही असे विचारले तर त्यांच्याकडे उत्तर नाही. ओला-उबेरच्या नावाने शंख करणाऱ्या रिक्षाचालकांकडून स्वतःमध्ये बदल कऱण्याची बिलगुल इच्छा दिसत नाही.

स्टेशनच्या आतील परिसरात स्टँड नसताना ही रिक्षा मात्र बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जातात. रिक्षा पार्किंग करण्याच्या नावाखाली भर रस्त्यावर रिक्षासह चारचाकी टॅक्सी देखील या परिसरात उभ्या असतात. यावेळी रेल्वे, एसटीने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना हेरायचे आणि त्यांच्याकडून वाटेल तेवढी रक्कम उकळायची असाच प्रकार रिक्षाचालकांकडून होत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. काही रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आहेत. मात्र, ही संख्या अत्यंत कमी आहे. रेल्वे स्टेशनसमोरून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असतात तरीसुद्धा त्यांच्यावर आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे कारवाई केली जात नाही, असाच सूर प्रवाशांनी आळवला.

रात्री २ ते पहाटे ४ वा. च्या सुमारास ज्या रिक्षा चालकांकडे लायसन्स व बॅच नसते असा चालकांचा यावेळी पुणे स्टेशन परिसरात जोरदार धंदा सुरू असतो. भाडे तत्वावर अथवा शिप वरा काही तथाकथित उत्तरप्रदेशातील बरीचशी मंडळी आता हा व्यवसाय जोमाने करू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. या गंभीर प्रसंगी आरटीओ व वाहतूक शाखेतील अधिकारी हे लक्ष देतील का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

- रिक्षा चालक : महादेव गायकवाड

ओला आणि उबेर मुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मीटर वाढल्याने व वाहतुकीच्या प्रचंड कोंडी मुळे मीटर प्रमाणे भाडे देण्यास प्रवासी देखील नाकारतात. ओला व उबेरचे बुकिंग केल्यानंतर पुन्हा कॅन्सल केल्यावर प्रवाशांकडून या कंपन्या पुढच्या राईडला दुप्पट भाडे आकारतात. यावर मात्र कोणीच बोलत नाही.

- रिक्षा चालक : ऐजाज शेख

पुणे स्टेशन परिसरात आम्हाला जागे अभावी अधिकृत असे रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे याचा गैर फायदा अनेक बाहेरील रिक्षा चालक घेत असतात. त्यामुळे प्रामाणिक रित्या रिक्षा चालकांना न्याय मिळत नाही.

यासंदर्भात आरटीओ चे अधिकारी अजित शिंदे म्हणाले की, नागरिक तक्रार करायला कंटाळा करतात. तरी देखील या बाबतीत गंभीर दखल घेतली जाईल.

जे रिक्षा चालक प्रवाशांची लूट करत असतील तर अशा वाहनांचे नंबर आम्हाला कळवा. त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.