Pune : विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रात करिअर करावे; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नोकरी पेक्षाही गायन, कला, अभिनय, चित्रकला, क्रीडा, हॉटेल, उद्योग,व्यवसाय यासारख्या विविध क्ष्रेत्रात पदार्पण करून आपले भवितव्य उज्जवल करावे”.
Pune
Punesakal
Updated on

Pune - मंचर ता १८ : “इयत्ता १० वी व १२ वी उतीर्ण झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार कॅरियर घडविण्यासाठी क्षेत्र निवडा. त्यासाठी मोबाईल वर गुगल मध्ये जाऊन आपल्याला अनेक नव्या वाटांची संधी उपलब्ध होईल.

नोकरी पेक्षाही गायन, कला, अभिनय, चित्रकला, क्रीडा, हॉटेल, उद्योग,व्यवसाय यासारख्या विविध क्ष्रेत्रात पदार्पण करून आपले भवितव्य उज्जवल करावे”. असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Pune
Mumbai : महावितरणची जुनी थकबाकी वसुली बेकायदेशीर, ग्राहकांनी जागरूक रहावे; होगाडे यांचे आवाहन

मंचर (ता आंबेगाव) येथील शिवगिरी कार्यालयात रविवारी (ता १८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी व अधिकारी पदी निवड झालेल्यांचा सन्मान प्रसंगी वळसे पाटील बोलत होते.

यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी कांतीलाल उमाप, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील , पूर्वा वळसे पाटील, सुषमा शिंदे , उषा कानडे , सुभाषराव मोरमारे, शिवाजीराव ढोबळे, रमेश खिलारी, सचिन पानसरे उपस्थित होते.

Pune
Mumbai News : पीओपी गणेशमूर्ती बंदीला भाजपचा विरोध; आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भूमिका

दिलीप वळसे पाटील म्हणाले. “इंग्रजीवर प्रभुत्व, व्यक्तिमहत्व, विकास संभाषण, कौशल्य हे गुण विद्यार्थीनी आत्मसात करावेत. शेतकरी कुटुंबातील सनदी अधिकारी कांतीलाल उमाप यांच्यासह पाच भावंडांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कॅरियर करून मिळवलेले यश विद्यार्थांना दिशा_दर्शक आहे”.

उमाप म्हणाले, “आंबेगाव-शिरूर च्या प्रगतीत दिलीप वळसे पाटील यांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, आत्मविश्वास व जिद्द बाळगून यशाचे शिखर गाठावे”.

प्रा. अनंत गोसावी, मानसी साकोरे , अनिदिता वालिया यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन व अविनाश ठाकूर यांनी आभार मानले.

Pune
Mumbai : महावितरणची जुनी थकबाकी वसुली बेकायदेशीर, ग्राहकांनी जागरूक रहावे; होगाडे यांचे आवाहन

(स्व) विलासराव देशमुख दिलदार मुख्यमंत्री

“उच्च तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री, मी व उपसचिव कांतीलाल उमाप होते. त्या वेळी त्यांनी अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय प्रस्ताव तयार केला. पण मंजुरी विषयी आम्ही चिंतेत होतो.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत विषय आल्याबरोबर लगेचच मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी महाविद्यालय मंजूर असे जाहीर केले. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबातील मुलांचे अभियंता होण्याचे स्वप्न साकार झाले. त्यांना हक्काचा रोजगार मिळाला. विलासराव देशमुख दिलदार मुख्यमत्री होते”.

दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.