Pune - पुण्यातील जयंत टोले हे कलाशिक्षक विद्यार्थ्यांना हरहुन्नरी करण्यासाठी तत्पर असतात. चित्रकलेतील विविध प्रकारांपासून ते मातीकामापर्यंत बरेच काही ते विद्यार्थ्यांना अनुभवायला देतात. अगदी नेपथ्यरचनेतील नवनिर्मितीचा आनंदही घ्यायला प्रवृत्त करतात.
नेपथ्यरचना हा माझा खास आवडीचा विषय. शाळेच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी तसेच स्पर्धांसाठी बसवायच्या नाटकांचे नेपथ्य करताना टाकाऊ वस्तूंपासून नवे काही घडवत असतो. यात विद्यार्थ्यांना सामील करून घेतो.
अनेक स्पर्धांमध्ये आम्ही नेपथ्याची पारितोषिके पटकावली आहेत. फायबर व मातीचा वापर करून कित्येक म्युरल्स केली आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना वेगळा कलाविष्कार अवगत होत राहिला आहे.
अठ्ठावीस वर्षे मी शाडूमातीच्या गणेशमूर्ती विपुल प्रमाणात आजवर तयार केल्या आहेत. गणेशोत्सवाआधी मुलांसह मिळून मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची मोठी मोहीमच आम्ही चालवतो. पर्यावरणपूरक मूर्ती लोकांसाठी उपलब्ध करून देतो,’’ असे टोले म्हणाले,
टोले यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रोत्साहन देण्याविषयी मार्गदर्शक सूचना आहेत. मुलांना वैविध्यपूर्ण कलांची ओळख करून देण्यावर माझा भर असतो. मातीकामात मी आणि विद्यार्थी एवढे रमतो, की चक्क टेराकोटा प्रकल्पच आम्ही सुरू केला आहे.
या अंतर्गत भट्टी व दोन यांत्रिक चाकेही आमच्याकडे आहेत. दिवाळीनिमित्त पणत्या व संक्रांतीआधी बोळक्यांची निर्मिती आम्ही करतो. विद्यार्थी यात अक्षरशः गुंतून जातात. हात बसल्यावर मातीच्या कुंड्या, फुलदाण्या, शोभेच्या वस्तू व मूर्ती घडवताना विद्यार्थ्यांना वेगळीच अनुभूती जाणवते. मातीशी जोडले जाऊन नवनिर्मितीचा आनंद अद्भुत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.