Pune Success Story: कळंब गावचा सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचा मसाज थेरपिस्ट, ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्काराने सन्मान!

Pune Success Story: कळंब गावचा सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचा मसाज थेरपिस्ट, ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्काराने सन्मान!

Latest Pune News : राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान व सानेगुरुजी कथामालाद्वारे ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
Published on

Latest Pune News : जागतिक टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद पटकाविले. त्यामध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून योगदान दिल्याबद्दल कळंब (ता. आंबेगाव) गावचे सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचे मसाज थेरपिस्ट अरुण जनाजी कानडे यांचा ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान व सानेगुरुजी कथामालाद्वारे ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कळंब येथील शेतकरी परिवारातील अरुण कानडे उदरनिर्वाहासाठी मुंबईत गेले. वडील जनाजी कानडे परळमधे गिरणी कामगार असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत अरुण यांनीही संघर्ष करत तुटपुंज्या पगारात चालक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी रीतसर मसाज थेरपीचे शिक्षण घेतले. मातोश्री लीलाबाईचे मार्गदर्शन अन पत्नी ज्योतीचे साथीने मसाज थेरपिस्ट म्हणून घरातच काम करण्यास सुरुवात केली.

Pune Success Story: कळंब गावचा सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचा मसाज थेरपिस्ट, ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्काराने सन्मान!
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

२०११ला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी झालेली भेट त्यांचा जीवनाला नवीन कलाटणी देणारी ठरली. २०१२मध्ये त्यांना आयपीएलसाठी मुंबई संघ आणि त्यानंतर बंगळूरू संघासाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपल्या मनमोकळ्या स्वभावाने खेळाडूंशी मैत्री जमवत भारतीय क्रिकेट संघात सपोर्ट स्टाफ म्हणून त्यांनी आपले स्थान पक्क केले.

अगदी एकदिवसीय ते टी-२० विश्‍वचषकापर्यंत म्हणजे आजतागायत दहा वर्षे ते भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहेत. संघातील खेळाडूंनी जरी मैदान जिंकले असले तरी संघासाठी मेहनत घेणारे अरुण कानडे अन इतर सपोर्ट स्टाफ म्हणून काम पाहणारे चेहरे त्या यशात पडद्यामागचे नायक आहेत. विश्‍वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विजेत्या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचाही सन्मान केला होता.

Pune Success Story: कळंब गावचा सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचा मसाज थेरपिस्ट, ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्काराने सन्मान!
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

याच पार्श्‍वभूमीवर सानेगुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीनेही अरुण कानडे यांचा मानाचा तिरंगा फेटा, संविधान प्रास्तविका व राष्ट्रभूषण विशेषांक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतीक वर्मा आणि किरण ननवरे यांनाही जीएमआरटी खोडदचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डी.एस. कानडे, आदर्श शिक्षक विकास कानडे व संतोष कानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी सम्राट कानडे, मंगेश उनकुले, यश कानडे, सचिन अभंग व स्वप्नील कानडे उपस्थित होते . सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे यांनी आभार मानले.

Pune Success Story: कळंब गावचा सुपुत्र भारतीय क्रिकेट संघाचा मसाज थेरपिस्ट, ज्ञानलक्ष्मी युवा गौरव पुरस्काराने सन्मान!
Pune : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गोमांसचे कंटेनर केले पोलिसांनी जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.