पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी (ता.१४) मकर संक्रांतीच्या दिवशी पन्नास हजारांच्या घरात पोचला आहे. सध्या जिल्ह्यात ४९ हजार ९१७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांचा (Corona Patients) आकडा शुक्रवारी (ता.१४) मकर संक्रांतीच्या दिवशी पन्नास हजारांच्या घरात पोचला आहे. सध्या जिल्ह्यात ४९ हजार ९१७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात १० हजार ७६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ४ हजार २७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे शहर व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.
जिल्ह्यातील दिवसांतील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ४८० रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५६२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ३९०, नगरपालिका क्षेत्रात ३४४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३०० नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत मिळून १ हजार ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ४८ हजार २० जण गृहविलगीकरणात आहेत. दिवसभरात ३८ हजार ६९३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ६७४ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ९९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४३७, नगरपालिका हद्दीतील ११५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
क्षेत्रनिहाय सक्रिय रुग्ण
क्षेत्राचे नाव, दाखल रुग्ण, गृहविलगीकरण
पुणे शहर, १२३५, २७ हजार ३०७
पिंपरी चिंचवड, ३४७, १२ हजार १६८
जिल्हा परिषद, १३०, ६ हजार ८७
नगरपालिका क्षेत्र, ९०, १ हजार ३२९
कॅंटोन्मेंट बोर्ड, ९५, १ हजार १२९
-----------------------------
एकूण, १८९७, ४८ हजार २०.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.