तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ग्रामसभेत निवडीबाबत एकमत न झाल्याने तंटामुक्तीच्या अध्यक्षाची निवड स्थगित करण्यात आली. गावातील अतिक्रमणाबाबत गायरान गटांची मोजणी करून शासकीय परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येईल आणि "अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय होणार नाही" याची दक्षता घेण्यात येईल असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला.
गावातील सर्व शासकीय कार्यालये शासकीय जागेत एका ठिकाणी आणण्याचे एकमताने ठरले. तसेच गाव टपरीमुक्त करण्यासाठी शासकीय जागेत व्यापार संकुल उभारण्यासाठी ग्रामपंचायत अग्रेसर असून त्यासाठी आमदार अशोक पवार यांनी सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही एक महिन्यापूर्वी झालेल्या विकास कामांच्या सभेत बोलताना दिली होती त्याबद्दल आजच्या ग्रामसभेत आमदार अशोक पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली पोलीस वसाहतिची जागा ताब्यात घेऊन ग्रामपंचायतिने त्या जागेचा योग्य उपयोग करावा असे ठरवण्यात आले.पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखडा व अंदाजपत्रकाबाबत विशेष ग्रामसभा घेण्याचे ठरले. तसेच गावातील साडेचार कोटीची थकबाकी वसूल करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
दरम्यान, आजच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्याचे ठरले होते, त्यासाठी दहा जणांनी अर्ज केला होता, परंतु त्यांच्यामध्ये एकमत न झाल्याने आजची तंटामुक्ती अध्यक्षाची निवड सर्वानुमते स्थगित करण्याचे ठरले.
सरपंच अंकिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी मागील विषय चर्चेत आणले. यावेळी ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा घडवून आणली. यावेळी काही प्रश्नांवर आरोप- प्रत्यारोप झाल्याने काहीकाळ ग्रामसभेत तणाव निर्माण झाला. यावेळी काहींनी हस्तक्षेप करून ग्रामसभेतील ताणतणाव कमी केल्यानंतर पुढे सभा सुरळीत झाली.
ग्रामसभेत पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, घोडगंगा कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक विश्वास ढमढेरे व पोपट भुजबळ, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, ऍड.सुधीर ढमढेरे, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, रवींद्र ढमढेरे, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, पोलीस हवालदार किशोर तेलंग, तलाठी ज्ञानेश्वर बराटे, माजी उपसरपंच राकेश भुजबळ, नवनाथ ढमढेरे, विजय ढमढेरे, सचिन ढमढेरे, राजेंद्र ढमढेरे, महेश भुजबळ, ऍड. सुरेश भुजबळ, कैलास नरके, श्रीकांत ढमढेरे, शंकर भुजबळ, सुनील ढमढेरे, दादा घुले, प्रदीप जेधे, अनिल भुजबळ, उमेश भुजबळ आदी विविध विषयांवर ग्रामस्थांनी चर्चा करून ग्रामसभेत विविध ठराव मांडण्यास मदत केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.