पुणे : निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्यासाठी शहरातील उत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे तळजाई टेकडी. सहकारनगर भागातील नागरिक व्यायामासाठी हमखास या टेकडीवर चालायला जातात. पुणेकरांना मोकळा श्वास पुरविणाऱ्या या टेकडीवरील तोडलेल्या झाडांची छायाचित्रे नुकतेच समाजमाध्यमांवर टाकले जात आहे. यातील तथ्ये नेमकी काय आहे, याचाच सकाळने घेतलेला आढावा.
भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांना विचारल्यास ते म्हणाले, ‘‘वन विभागाद्वारे तळजाई टेकडीवर ‘मीयावाकी’ पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. त्या अंतर्गत परदेशी वृक्षांना काढून स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तसेच या १ हेक्टर परिसरात स्थानिक प्रजातींची वृक्ष लावून हरित अच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये ३३ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे वृक्ष तोडी नाही तर स्थानिक वृक्षांची लागवड होत आहे.
तळजाईचा जैवविविधतेने समृद्ध निसर्गरम्य परिसर ही नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. दरम्यान प्रशासनाचे विविध प्रकल्प आणि उपक्रमांमुळे येथील जैवविविधतेवर परिणाम होण्याची चिंता वारंवार निसर्ग प्रेमींनी व्यक्त केली आहे. तसेच विविध संघटना व संस्थांच्या वतीने ‘तळजाई बचाव अभियाना’द्वारे प्रशासनाच्या विविध प्रकल्पांचा विरोध करण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी शहरातील वेगवेगळ्या संस्था, संघटना, निसर्ग प्रेमी नेहमी तत्पर असतात. दरम्यान तळजाईवर वृक्षारोपनाच्या मोहीम प्रक्रिये अंतर्गत ही कामे होत असल्याचे वन विभागाद्वारे सांगण्यात आले आहे.
मीयावाकी पद्धत काय?
‘मीयावाकी’ पद्धतीमध्ये प्रत्येक चौरस मीटर जागेत दोन ते चार झाडे लावली जातात. या पद्धतीनुसार दोन ते तीन वर्षात ही झाडे वाढतात आणि ती स्वयंपूर्ण असतात. शहरीकरण आणि कॉंक्रीट जंगलामुळे वाढणाऱ्या तापमानाला कमी करण्यास हे ‘मीयावाकी जंगल’ मदत करते. तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषणाला कमी करण्यास उपयुक्त ठरते. यामुळे स्थानिक पक्षी आणि कीटक आकर्षित होतात व ‘कार्बन सिंक’ तयार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.