Pune : राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रात देखील 'राईट टू हेल्थ'

सावंत म्हणाले, आगामी काळात सर्व सेवा सुविधांनी युक्त १५०० रूग्णवाहिका राज्य सरकार घेणार असून त्याचबरोबर एअर अँब्युलन्सची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
pune
puneSakal
Updated on

कात्रज - महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जी सुसूत्रता हवी ती अजूनही आढळून येत नाही. या पार्श्वभूमीवर राजस्थानसारख्या राज्याने राबविलेल्या 'राईट टू हेल्थ' या धोरणाची महाराष्ट्र राज्य पातळीवर अंमलबजावणी करून आरोग्य यंत्रणेत अधिकची सुसूत्रता आणू, असे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले.

जनसेवा फाऊंडेशन संचालित अनाथ निराधार पुनर्वसन केंद्रातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ. सुभाष सांळुके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

pune
Mumbai News : गारगई आता मुंबईची तहान भागविणार...

या वेळी जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, मीना शहा, प्रेमा साळुंके, आरोग्य विभागाचे माजी उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण, डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुभाष साळुंके यांचा पुणेरी पगडी, मानपत्र आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

सावंत म्हणाले, आगामी काळात सर्व सेवा सुविधांनी युक्त १५०० रूग्णवाहिका राज्य सरकार घेणार असून त्याचबरोबर एअर अँब्युलन्सची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी जनसेवा फाऊंडेशनच्या कामाने प्रभावित होऊन सावंत यांनी फाऊंडेशनच्या अनाथ निराधार पुनर्वसन केंद्राला पाच लाख अकरा हजार रूपायांची देणगी घोषित केली.

यावेळी डॉ. सुभाष सांळुके यांनी माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर उपयोग व्हावा, या भावनेपोटी निशुल्क काम करत असल्याचे सांगताना जनसेवा फौंडेशनच्या अनाथ निराधार पुनर्वसन केंद्राला दोन लाख रूपायांची देणगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद शहा यांनी तर सूत्रसंचालन प्रा. जे. पी. देसाई यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.