पुणे : प्रवासी भाडेदरात वाढ करावी, या मागणीसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे शहरातील कॅबसेवा काही प्रमाणात मंगळवारी विस्कळित झाली. प्रवासी भाडेदरात वाढ करावी, अशी मागणी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने केली आहे.
तर कॅब कंपन्यांनी त्यास नकार दिला आहे. भाडेवाढीसाठी ऑटो टॅक्सी बस ट्रान्स्पोर्ट फेडरेशनतर्फे बुधवारी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले,
‘‘कॅब बंद ठेवण्याच्या आजच्या आवाहनाला चालकांनी चांगला प्रतिसाद दिला. ॲपवरून अनेक ठिकाणी कार मिळत नव्हत्या. त्यात अनेक रिक्षाचालकही सहभागी झाले होते. कॅब संघटनांची मुजोरी मोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.’’
‘उबर’चे प्रवक्ते म्हणाले, ‘‘कॅबचालकांना काही ठिकाणी धमकाविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे शहरातील काही भागात सेवा विस्कळीत झाली. कॅबचे भाडे वाढविण्याची मागणी लागू केल्यास, प्रवाशांना ६० टक्क्यांपर्यंत जास्त पैसे द्यावे लागतील. त्यातून कॅब चालकांच्या रोजीरोटीलाही धक्का बसेल. त्याचा परिणाम कॅब व्यवसायावर होईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.