Pune : फ्रान्सच्या शिक्षिकेची जिल्हा परिषद शाळेला भेट; वर्गाची स्वच्छता मुले करतात हे ऐकल्यावर 'त्या' थक्क झाल्या

शिक्षण पद्धती समजून घेतली. त्यांच्या शाळेतील इतर शिक्षकांना दाखवायला शाळेचे फोटो काढून घेतले.
Pune
PuneSakal
Updated on

राजेश कणसे

आळेफाटा - मूळच्या फ्रान्सच्या असलेल्या लोला या आपल्या मुलीला शिक्षणासाठी पुणे येथे सोडवायला आल्या होत्या. दोन दिवस सुट्टी असल्या कारणाने त्या मुली सोबत राजुरी (ता.जुन्नर)येथील पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रात आल्या होत्या.

लोला या फ्रान्स मधल्या नर्सरी शाळेच्या शिक्षिका असुन पराशर कृषी व संस्कृती पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी शाळा बघण्याची इच्छा मनोज हाडवळे यांच्या व्यक्त केली. शिक्षकांच्या मदतीने त्यांना शाळा बघण्याचा योग आला.

Pune
Mumbai : पाकिस्तानमधील दोघी भारतात येणार, अतुल भातखळकर यांचे प्रयत्न सफल

लोला यांणी जिल्हा परिषद शाळेचा परिसर तिथली स्वच्छता, कलरफुल भिंती, भिंतींवरची चित्रे, वर्गांमधील तक्ते, त्यावरची माहिती,वर्गांमधील बैठक व्यवस्था, तिथला अभ्यासक्रम, मुलांचा आहार हे सगळं बघून त्या भारावून गेल्या.

वर्गाची व परिसराची स्वच्छता मुले करतात हे ऐकल्यावरत्या थक्क झाल्या. त्यांनी आवर्जून मुलांची पुस्तकं आणि त्यांचा अभ्यासक्रम बघितला.

Pune
Pune ATS : आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक कोण? ATS कडून 'त्या' दोघांची कसून चौकशी

इथली शिक्षण पद्धती समजून घेतली. त्यांच्या शाळेतील इतर शिक्षकांना दाखवायला शाळेचे फोटो काढून घेतले.लोला यांचे स्वागत मुख्याध्यापक सयाजी हाडवळे यांणी केले तर त्यांचा सत्कार शाळेतील महिला शिक्षिकांनी केला.

लोला- फ्रान्स देशातील शिक्षिका

ग्रामीण भागातील शाळा इतक्या सुंदर असतात ते आज मी पहिल्यांदाच पाहत असुन येथील शाळेचा परिसर ,पटांगण ,लायब्ररी,संगणक रुम, गार्डन,प्रार्थणा हॉल अतिशय चांगले असुन येथील मुलांणा मिळणारा सकस आहार देखील चांगला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.