धायरी - नऱ्हे गावातील तुळजाभवानी मंदिरालगतच्या अनुज विहार, मातृ छाया व सिद्धी आंगण या तीन सोसायट्यांमधील दहा सदनिकांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड लंपास केली. रविवारी पहाटे दोन ते अडीच दरम्यान हे प्रकार झाले. त्यामुळे रहिवासी हादरले आहेत.
काही चोरटे चारचाकी मोटारीतून आले होते. मातृछाया सोसायटीतून त्यांनी नवी मोटार चोरून नेली, परंतु नवले पुलाजवळ रात्री नाकेबंदी असल्याचे पाहून त्यांनी मोटार रस्त्यावरच ठेवून स्वतःच्या चारचाकीतुन पळ काढला. घरफोडी झालेल्या सर्व सदनिका बंद होत्या.
सदनिकांत राहणाऱ्या व्यक्ती आल्यानंतर नेमकी माहिती मिळू शकेल. त्या मजल्यांवरील इतर सदनिकांचे दरवाजे बाहेरून बंद करून तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा मागे करून चोरट्यांनी डाव साधला. मोबाईल चार्जर आणि इलेक्ट्रिक शेगडी अशा वस्तू सुद्धा त्यांनी चोरुन नेल्या.
आतापर्यंत एका सदनिकाधारकाने फिर्याद दिली. त्यांचे नाव मयूर देवराम पवार असे आहे. सोन्याचे दागिने, घड्याळ, नव्या गाडीची चावी असा दोन लाख ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली.
इतर सदनिकाधारक पुढील दोन दिवसांत तक्रार दाखल करतील. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक सणस पुढील तपास करीत आहेत.
नऱ्हे परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्या पोलिस यंत्रणा अपुरी पडत आहे. चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. अशा घटना होऊ नये म्हणून या परिसरात पोलिसांनी गस्त आणखी वाढविणे गरजेचे आहे
-प्रा. दत्तात्रय पिसाळ, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.