पुण्यात रोज ‘म्युकरमायकोसिस’च्या दहा रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

‘म्युकरमायकोसिस’ (काळी बुरशी)च्या संकटावर मात करण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेत या आजाराच्या दहा रुग्णांवर रोज शस्त्रक्रिया होईल.
Mucormycosis
MucormycosisSakal
Updated on

पुणे - ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) (काळी बुरशी)च्या संकटावर (Crisis) मात करण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेत या आजाराच्या दहा रुग्णांवर (Patient) रोज शस्त्रक्रिया (Surgecy) होईल. तेवढ्याच क्षमतेचे ‘ऑपरेशन थिएटर’ महापालिकेच्या दळवी रुग्णालयात (Dalvi Hospital) उभारले जात आहे. त्यासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञांसह ‘आयसीयू’ विभागाच्या विस्ताराचे बुधवारी हाती घेतले. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रुग्णांना उपचार मिळणार आहेत. (Pune ten patients with Mucormycosis undergo daily surgery)

नव्या उपचार व्यवस्थेतील ‘ऑपरेशन थिएटर’ चोवीस तास सुरू राहणार असून, पुढील १५ दिवसांत रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार केले जाणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच म्युकरमायकोसिसच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, खासगी रुग्णालयांतील उपचार खर्चामुळे या आजाराच्या रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्याची दाखल घेत, म्युकरमायकोसिसच्या निदानासह उपचारासाठी शिवाजीनगरमधील दळवी रुग्णालयात १५ बेड उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परंतु, आजाराचे स्वरूप, त्यातून रुग्णाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, पुढच्या दहा दिवसांत नवे ऑपरेशन थिएटर सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली.

Mucormycosis
Corona Update: राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार नवे रुग्ण

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी, यासाठी खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येणार असून, विशेषतः गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्याकडून सल्ला घेण्यात येईल. या आजाराच्या रुग्णांच्या उपचार सुविधा वाढवून पुढच्या काही दिवसांत २५ पेक्षा अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आहे.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

अशी असेल उपचार सुविधा

  • पुणे महापालिकेच्या हद्दीतील रुग्णांना प्राधान्य

  • शहरी गरीब योजनेतून उपचार

  • आयसीयू बेड वाढविणार

  • रुग्णांच्या देखरेखीसाठी २४ तास तज्ज्ञ डॉक्टर

  • रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

  • स्वतंत्र रुग्णवाहिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.