आंबेठाण : खेड तालुक्यासह पुणे शहराला पाणी मिळणार म्हणून वरदान ठरणारे भामा आसखेड धरण(ता. खेड) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या ६०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला पाण्याचा फायदा होत आहे.यावर्षी धरण उशिरा का होईना भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
१ जून पासून धरण परिसरात ८६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे.धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा ७.६७ टीएमसी इतका आहे.खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरणातून सायंकाळी चार वाजल्यापासून ६०० क्युसेसने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. त्यासाठी दरवाजे ५ सेंमी ने वर उचलण्यात आले आहे.
आजपर्यंत धरण परिसरात ८६२ मिमी पाऊस झाला आहे तर आज सकाळी सहा वाजलेपासून सायंकाळी चार पर्यंत १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.भामा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. अजूनही धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून पाऊस असाच सुरू राहीला तर विसर्ग अजून वाढवावा लागेल असे धरण प्रशासनाच्या वतीने प्रेमनाथ शिंदे आणि के.डी.पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.