Pune : काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; 'वाघिणीने' मृत्यूच्या जबड्यातून पतीला कसे वाचवले ?

वन खात्याने 'ही' बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे
Pune
Pune Sakal
Updated on

केडगाव - नानगाव ( ता. दौंड ) येथे शेतमजुरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. काशिनाथ बापू निंबाळकर ( वय ५२, रा. नानगाव ) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी ही घटना आहे.

नानगाव भीमा नदीकाठी वसले आहे. निंबाळकर यांच्या घराभोवती ऊस आहे. काशिनाथ निंबाळकर हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लघवीसाठी घराबाहेर आले. घरामागे निंबाळकर हे खालीबसून लघवी करत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली.

बिबट्याला निंबाळकर यांचा गळा पकडायचा असावा मात्र निंबाळकर खाली बसलेले असल्याने बिबटयाच्या तोंडात त्यांची हनुवटी आली. हल्ला होताच निंबाळकर मोठ्याने ओरडले. काशिनाथ यांच्या आवाजाने यांच्या पत्नी सरूबाई ( वय ४५ ) व त्यांच्या कुत्र्याने घरामागे धाव घेतली. दरम्यान निंबाळकर यांचा प्रतिकार चालू होता.

Pune
PM Modi Pune Visit: 'मोदी गो बॅक', 'मणिपूरवर बोला'; काँग्रेस, सामाजिक संघटनांकडून पुण्यात निषेध आंदोलन

कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली तर सरूबाईने लाकडाने बिबटयावर हल्ला चढवला. निंबाळकर हे बिबट्याला हाताने प्रतिकार करत असताना सरूबाई व कुत्र्याच्या हल्ल्याने अखेर बिबट्याने काशिनाथ यांना सोडत उसात धूम ठोकली.

निंबाळकर यांच्या हनुवटीला सहा टाके पडले आहेत. हाताने प्रतिकार करत असल्याने हाताला नख्या लागल्या असून त्यांचा एक दात खुडला आहे. निंबाळकर यांना ससून रूग्णालयात आवश्यक ती लस दिल्यानंतर केडगाव येथील वरद विनायक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॅा. सचिन भांडवलकर यांनी सांगितले.

नानगावचे माजी उपसरपंच संदीप खळदकर यांच्या शेतात निंबाळकर काम करतात. खळदकर म्हणाले की नदीकाठचा परिसर हा बिबट्याचा आश्रयस्थान बनला आहे. गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अनेक बिबटे राहत आहेत.

वन खात्याने 'ही' बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. वन खात्याने पिंजरा लावून संबंधित बिबट्यांना पकडण्याची मागणी खळदकर यांनी केली आहे.

Pune
Mumbai Crime : बिटकाॅईन गुंतवणुकीतून महिलेची फसवणूक; 10 जणांना 6 लाखांचा गंडा

वनअधिकारी कल्याणी गोडसे म्हणाल्या, ''बिबट्या वयाने लहान असल्याने सुदैवाने निंबाळकर यांची सुटका झाली आहे. घटनेचा पंचनामा केला असून लवकरच आर्थिक मदत केली जाईल. ग्रामपंचायतीचा ठराव आल्यानंतर पिंजरा मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल.''

सरूबाई निंबाळकर म्हणाल्या, ''बिबट्याचा हल्ला पाहून अंगाचा थरकाप उडाला. तरीही नव-याचा जीव धोक्यात असल्याने मागे हटले नाही. जीवाच्या आकांताने बिबट्यावर तीन-चार थोपाट्या घातल्या. पांडुरंगाने भक्ताला वाचविले आहे.

वेळ आली होती पण काळ आला नव्हता असेच म्हणावे लागेल.'' निंबाळकर यांनी बायकोमुळे जीवदान मिळाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.