Pune to Bangkok flight: गुड न्यूज! पुण्यातून बँकॉक अन् दुबई विमानसेवेला मंजुरी; 'या' तारखेपासून होणार उड्डाण

Pune News: पुणे ते बँकॉक दरम्यान पूर्वी विमानसेवा सुरू होती. मात्र कोविडच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सेवा बंद झाली. त्यावेळी बँकॉकची सेवादेखील बंद झाली. ती अद्याप सुरू झालेली नाही. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्याने यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार आहे.
Pune Airport
Pune Airportsakal
Updated on

Pune News: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु होतेय. केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांनीही याबाबत माहिती दिली.

यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता होतीच. एअर इंडिया एक्स्प्रेस यासाठी प्रयत्नशील होतं. त्यांनी पुणे विमानतळ व बँकॉक विमानतळ प्रशासनाकडे स्लॉटसंदर्भात विचारणा केली होती. दोन्ही प्रशासनाने स्लॉट उपलब्ध असल्याचे विमान कंपनीला कळविले. त्यामुळे यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून बँकॉकसाठी विमान झेपावणार हे निश्चत झाले आहे.

पुणे ते बँकॉक दरम्यान पूर्वी विमानसेवा सुरू होती. मात्र कोविडच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सेवा बंद झाली. त्यावेळी बँकॉकची सेवादेखील बंद झाली. ती अद्याप सुरू झालेली नाही. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्याने यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार आहे.

Pune Airport
ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

दैनंदिन ९५ विमानांचे उड्डाण

पुण्याहून दोन्ही टर्मिनल मिळून सध्या सुमारे १९० विमानांची वाहतूक होत आहे

यात दैनंदिन सरासरी ९५ विमानांचे उड्डाण व ९५ विमानांचे लँडिंग होते

प्रवासी संख्या : सरासरी ३५ हजार (दैनंदिन)

मुरलीधर मोहोळ यांचं ट्वीट

पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे !

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.