बारामती - पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य सायकल स्पर्धेमध्ये राजस्थानच्या मनोज तरड 'घाटाचा राजा' तर सेनादलाचा दिनेश कुमार हा राष्ट्रीय विजेता ठरला.
विजेत्यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, विश्वास देवकाते, पोर्णिमा तावरे, पुरूषोत्तम जगताप, किरण गुजर, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, प्रताप गायकवाड, सचिन सातव उपस्थित होते.
पुणे ते बारामती पुरूष गटाच्या राष्ट्रीय स्तरावर दिनेश कुमार हा 2 तास 33 मिनिटे या विक्रमी वेळेत 120 किमीचे अंतर पार करत विजेता ठरला. मुकेश कुमार (राजस्थान, 2 तास 34 मि) व के. व्ही. व्यासख (कर्नाटक, 2 तास 37 मि) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
सासवड ते बारामती गटात उत्तर प्रदेशच्या दिनेश कुमार (1 तास 34 मि) याने प्रथम क्रमांक पटकावला. पुणे ते बारामती राज्य स्तर पुरुष गटामध्ये सुर्या रमेश (पुणे), सिद्धेश पाटील (क्रिडा प्रबोधिनी पुणे) व ओम बाळासाहेब (अहमदनगर) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असलेला 'घाटाचा राजा' हा बहुमान राजस्थानच्या मनोज तरड याने पटकावला. त्याने राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 9 मिनिटे 34 सेकंदामध्ये दिवे घाट पार केला. राज्य स्तरावर सिद्धेश पाटील याने हा 9 मिनीटे 57 सेकंदामध्ये हा बहुमान मिळवला.
मेन इलाईट सासवड ते बारामती (85 किमी) स्पर्धेत रविंद्र बदाणे, विठ्ठल भोसले व विकास रोठे यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. माळेगाव ते बारामती (15 किमी) महिलांच्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये मणिपूरच्या मयंगलम चानू हिने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या मनाली राठोजी व कर्नाटकच्या शहा कुडीगनूर यांना द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
16 ते 17 वर्षे (15 किमी) माळेगाव ते बारामती मुलींच्या गटात श्रावणी परीट, अनुष्का राऊत व आर्या ननावरे तर मुलांच्या गटात हर्षद पाटील, जयदीप काटकर व ओम काटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला असून 14 व 15 वर्षाच्या गटात उत्कर्ष गार्दी व शिरीषकुमार शिंदे याने पहिले व दुसरे तर मैत्रेय भालेराव याने तिसरे स्थान मिळविले. प्रास्ताविक अॅड. संदीप कदम, सूत्रसंचालन अमृता खराडे व प्रा. नितीन लगड यांनी केले, आभार माजी नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.