Sunil Deodhar : पुणे वाहतूक कोंडीमुक्त बनविण्याचा निर्धार ; सुनील देवधर,समरसता सेवा पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे भाजप नेते सुनील देवधर यांनी आपल्या मनोगतात वाहतूक कोंडी, प्रदूषणमुक्त पुण्याचा निर्धार व्यक्त केला.
Sunil Deodhar
Sunil Deodharsakal
Updated on

पुणे/घोरपडी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे भाजप नेते सुनील देवधर यांनी आपल्या मनोगतात वाहतूक कोंडी, प्रदूषणमुक्त पुण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करूया, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

वानवडीस्थित महात्मा फुले सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार प्रदीप रावत, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, कुणाल टिळक, अभिनेते अजिंक्य देव, ओबीसी शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, सामाजिक समरसता मंचाचे नंदकुमार राऊत, संजय गाते, दिनेश होले, लहुजी वस्ताद समाधी समितीचे सुखदेव अडागळे आदी उपस्थित होते.

Sunil Deodhar
Pune Girls Drug Matter: ड्रग्ज घेऊन तरुणी आऊट ऑफ कन्ट्रोल! अभिनेत्यानं शेअर केला काळजीत टाकणारा व्हिडिओ

संत गाडगेबाबांवर चित्रपट बनवणारे ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त, माजी उपमहापौर, परीट समाजाचे नेते नाना नाशिककर आणि राज्यसभेच्या नवनियुक्त खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा या वेळी सन्मान करण्यात आला, तसेच १०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. ‘राज्यसभा खासदार म्हणून मला पक्षाने संधी दिली असून, हे पुणेकरांचेच आशीर्वाद आहेत, येणाऱ्या काळात पुण्यातील कामासाठी प्रामाणिकपणे काम करेन’, अशा भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.