Pune Accident News : पुण्यातील पर्यटकांच्या बसला अपघात; दोन तरुणींचा मृत्यू, ५५ जखमी

सुटीनिमित्त पर्यटनासाठी शनिवारी कोकणातील हरिहरेश्वरकडे निघालेल्या पुण्यातील पर्यटकांची बस ताम्हिणी घाटात उलटली.
Pune Accident News
Pune Accident News esakal
Updated on

माणगावः सुटीनिमित्त पर्यटनासाठी शनिवारी कोकणातील हरिहरेश्वरकडे निघालेल्या पुण्यातील पर्यटकांची बस ताम्हिणी घाटात उलटली. या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला तर ५५ प्रवासी जखम झाले.

पुण्यातील कोथरूड परिसरातील विविध कंपन्यांचे सुमारे ५७ कर्मचारी शनिवारी पहाटे कोकणातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी ‘साई गणराज’ या खासगी कंपनीच्या बसने निघाले होते.

सकाळी साडेसातच्या सुमारास बस कोंडेथर गावच्या हद्दीतील वळणार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून ती उलटली. या अपघातात सुरभी मोरे (२३), कांजन मांजरे (२०) या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर उर्वरित ५५ पर्यटक प्रवासी जखमी झाले. त्यात २३ महिलांचा समावेश आहे.

Pune Accident News
महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा पाणबुडी प्रकल्प आहे तरी काय?, कोकणचं होणार मोठं नुकसान

अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माणगावमधील ‘साळुंके रेस्क्यू टीम’ला पाचारण केले. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातप्रकरणी बसचालक भैरवनाथ कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Accident News
Pakistan News: इम्रान खान यांना मोठा धक्का; 2024 मधील निवडणुकीसाठीचा अर्ज फेटाळला

मोठी दुर्घटना टळली

जिथे अपघात घडला त्या ठिकाणी धोक्याचे वळण असल्याने भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी राजेंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करून वळणार लोखंडी संरक्षण कठडे उभारले होते. ही बस उलटून कठड्यांना अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.