आळंदी : कार्तिकी वारीसाठी सोमवार (ता. ४) ते पुढील मंगळवार (ता. १२) पर्यंत आळंदी शहरात दिंड्यांची वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंदी आहे. परिसरातील मरकळ धानोरे औद्योगिक भागात पुणे भोसरीमार्गे जाणारी वाहने चऱ्होली खुर्द, चऱ्होली बुद्रुक बाह्यवळण मार्गाने वळवली जातील. चिंबळी-चाकण-मोशी मार्गे येणारी वाहतूक पुणे नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक अलंकापुरममार्गे वळविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे यांनी दिली.
गोडसे म्हणाले, ‘‘आळंदी परिसरातील कामगार वर्गांच्या वाहनांना बाह्यवळणमार्गे सोडले जाईल. शहरातील नागरिकांनी शक्यतो चारचाकी वाहनांचा वापर करू नये.’’
प्रवेश बंदी केलेले मार्ग
मोशी चौकातून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.
भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना बंदी.
चिंबळीफाटा, चाकण येथून आळंदीकडे येणारा मार्ग बंद.
शेलपिंपळगाव, वडगांव घेनंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वहनांना बंदी.
मरकळमार्गे आळंदीकडे येणारा मार्ग बंद
पुणे-दिघी मॅगझीन मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग
जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्ग, चौविसावाडी.
जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी.
जय गणेश चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी.
कोयाळी कमान, कोयळी-मरकळगाव मार्गे पुणे.
धानोरे फाटा-चऱ्होली फाटा मार्गे भोसरी-विश्रांतवाडी.
भोसरी मार्गे-मोशी-चाकण. अलंकापुरम - जयगणेश साम्राज्य चौक मार्गे-चाकण. मरकळला जाण्यासाठी चऱ्होली फाटा - धानोरेफाटा मार्गे - मरकळ- लोणाकंदमार्गे पुणे.
पार्किंगची व्यवस्था
वडगांवकडून येणाऱ्या वाहनांसाठी विश्रांतवडाजवळील मोकळी जागा. तसेच वडगाव रस्त्यावरील जलाराम गोशाळेजवळील नगरपरिषद पार्किंग.
चाकण आळंदी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी हनुमानवाडी इंद्रायणी हॉस्पिटल समोर.
आळंदी तसेच चिंबळी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी बोपदेव चौकाजवळ मुंगसे पार्किंग
देहूगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी वहिले पार्किंग आणि ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव, कचरे हॉस्पिटल समोर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.