Pune Traffic-Navratri 2023 : नवरात्र उत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील
pune traffic changes in navratri 2023 alternative road parking transport marathi news
pune traffic changes in navratri 2023 alternative road parking transport marathi news sakal
Updated on

पुणे : शहरात नवरात्र उत्सवात भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

अप्पा बळवंत चौक

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहील. पर्यायी मार्ग- अप्पा बळवंत चौक, गाडीतळ पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने इच्छित ठिकाणी जाता येईल.

भवानी माता मंदिर :

भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्त्यावर वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावर वाहनांना नो-पार्किंग राहील. वाहनचालकांनी पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करावीत.

पर्यायी मार्ग-

- रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी ए.डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून जावे.

- भवानी माता मंदिर रस्त्यावरून जुना मोटार स्टॅंडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भगवान बाहुबली चौकातून जावे.

- रामोशी गेटकडून पीएमपी बसेसची वाहतूक सेव्हन लव्हज् चौक येथून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौक, डावीकडे वळून खाणेमारुती चौक अशी सुरु राहील.

- सेव्हन लव्हज् चौकातून येणारी वाहतूक गोळीबार मैदानाकडे वळविण्यात यावी.

तांबडी जोगेश्वरी मंदिर -

लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिरदरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे. ‘सकाळ’ प्रेसकडून जोगेश्वरी मंदिराकडे जाण्यास अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांस प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग-

लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदिराकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनी सरळ सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकात उजवीकडे न वळता सरळ शनिवारवाडामार्गे पुढे जावे.

नो-पार्किंग-

बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी, शनिवार पेठेत अष्टभुजा देवी मंदिर, नारायण पेठेत अष्टभुजा दुर्गादेवी या ठिकाणी नवरात्रोत्सवातील १० दिवसांसाठी सर्व वाहनांना पार्किंग बंद राहील.

पार्किंगसाठी ठिकाणे-

टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर

मंडई येथील मिनर्व्हा, कै. सतीश मिसाळ पार्किंग तळावर आणि पार्किंग झोनमध्ये.

चतुःशृंगी माता मंदिर -

सेनापती बापट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास पत्रकार नगर चौकातून सेनापती बापट रस्ता जंक्शनकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजी हाउसिंग चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी सोडण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.