Pune Traffic Police - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या दंड रकमेबाबत तडजोड करण्यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात २८ ऑगस्टपासून मदतकक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाच्या मदतीने संबंधित वाहनचालकांना तडजोडीअंती दंडात सवलत मिळणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने २४ ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीस पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि आणि मोटार वाहन न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित चलनांच्या तडजोडीनंतर दंडातील सवलतीसाठी मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या कक्षाच्या माध्यमातून वाहनचालकांच्या प्रलंबित चलनाबाबत तडजोड करून सवलत देण्यात येणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रलंबित खटले असलेल्या वाहनचालक आणि मालकांनी २८ ऑगस्टपासून सकाळी ११ ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या कालावधीत वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
लोकअदालत नऊ सप्टेंबरला
येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात नऊ सप्टेंबरला लोकअदालतीचे आयोजन केले आहे. वाहतूक नियमांबाबत प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ही लोकअदालत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.