धायरी : सिंहगड रस्त्यावरील असलेल्या धायरी फाटा पुलाखालील चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे धायरी, नऱ्हे व खडकवासला कडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
भर चौकातच असलेले फळविक्रेते, रिक्षा थांबे आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे या भागातील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या समस्यांकडे कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याने आम्हाला कुणी वाली आहे का? असा सवाल वाहनचालक व रहिवासी करीत आहेत.
Pune