Pune : वाहतुक समस्या हि पोलिसांची जबाबदारी ; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

वाहतुक समस्या सोडविण्यासाठी जादा मनुष्यबळ
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ताsakal
Updated on

पुणे : शहरातील वाहतुक समस्येची जबाबदारी आम्ही कधीच झटकणार नाही, रस्त्यात वाहतुक पोलिसांचा अभाव असतो, हेही आम्ही मान्य करतो. मात्र वाहतुक समस्या शहराच्या नगर नियोजनाचाही भाग आहे, याचा कुठेतरी विसर पडतो आहे. अरुंद रस्ते, खड्डे, पाणी, मेट्रो,बीआरटी, उड्डाणपुलांची कामे अशा परिस्थितीत केवळ एक तृतीअंश इतकाच रस्ता वापरण्यास मिळतो, त्यावरुन वाहतुक सुरळीत ठेवण्याचे काम आम्ही करतो, आता वाहतुक शाखेला अधिक मनुष्यबळ देऊन वाहतुक कोंडी सोडविण्यास प्राधान्य देऊ, असे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिले.

पोलिस आरोग्य मित्र फाऊंडेशनतर्फे "शतक मोकाचे, कौतुक पुणे पोलिसांचे' या कार्यक्रमाअंतर्गत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संवादाचा कार्यक्रम हिराबागेजवळील ज्योत्स्ना भोळे सभागृहात येथे घेण्यात आला. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी गुप्ता यांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याबाबत (मोका) व पुणे पोलिसांच्या विविध कामांविषयी विविध प्रकारचे प्रश्‍न विचारले, गुप्ता यांनीही त्याबाबतची उत्तरे देत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा धारणे उपस्थित होत्या.

"शहरातील वाहतुक कोंडी आणि रस्त्यावर पोलिस नसतात' याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाविषयी गुप्ता म्हणाले, ""एका इमारतीच्या ठिकाणी दहा इमारती झाल्यास तर प्रश्‍न गंभीर होणार, त्याच पद्धतीने वाहतुकची समस्या आहे. हा नगरनियोजनाचा भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आता मनुष्यबळ वाढवून सध्याच्या कामापेक्षा अधिक काम पोलिसांकडून केले जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.''

"मोका'च्या कारवाईबाबेत यांनी सांगितले की,""शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगार मोठ्या प्रमाणात गुन्हे करीत होते. व्हॉटसअपवर डिपी ठेवणे, कारागृहातुन सुटल्यावर रॅली काढणे, जमीन बळकावण्याचे प्रकार सुरु होते. मात्र अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. आता कोणाची हिम्मत होत नाही, तसे वागण्याची. "मोका'मुळे पोलिसांना अधिक अधिकार मिळतात, आरोपींना लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे सोपे होते. गुन्हेगारांनी स्वतःची कुंडली स्वतः तयार केली. आम्ही केवळ ते कागदपत्रे व कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांच्यावर कारवाई केली.'' नियमीत गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हेगारी वाढत असून त्यासाठी पाच विविध विभागांची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.

उत्सव काळात ध्वनीक्षेपकावर नियंत्रण ठेवता आले नाही - आयुक्त

कोरोनामुळे दोन वर्ष नागरीकांवर निर्बंध होते. त्यामुळे यंदाच्या उत्सवांना शिथीलता दिली होती. मात्र दहिहंडी, गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र यापुढे नक्कीच कारवाई केली जाईल. क्रिकेटमध्ये हेल्मेट न घातल्याने काही अपघात घडले, त्यानंतर आता हेल्मेटशिवाय क्रिकेट खेळले जात नाही. त्याच पद्धतीने जर सायकलस्वार हेल्मेट वापर असतील, तर दुचाकीस्वारांनीही हेल्मेट घातले पाहीजे. हा स्वयंशिस्तीचा भाग आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.