Pune News : नगर रस्ता बीआरटी काढण्याच्या निर्णयातुन महापालिका आयुक्तांची सार्वजनिक वाहतुकीबाबतची अखेर खरी भुमिका स्पष्ट

सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून महापालिका प्रशासनावर आरोप
real role of  municipal commissioner in public transport is clear decision to remove city road BRT
real role of municipal commissioner in public transport is clear decision to remove city road BRTSakal
Updated on

पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटीमुळे किमान बसमधून तरी नागरीक वाहतुक कोंडीत न अडकता वेळेत प्रवास करु शकत होते. मात्र नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीस केवळ बीआरटी जबाबदार असल्याचे ठरवून बीआरटी काढण्याचा निर्णय घेऊन महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबाबत त्यांची खरी भुमिका दाखविली आहे.

कोणाही नियोजनकारांचा सल्ला न घेता, पीएमपीचा अहवाल डावलले आहे, विकास आराखड्यातील व सार्वजनिक वाहतुकीतील महत्वाचा प्रकल्प कोणत्या आधारावर उध्वस्त केला ? असा प्रश्‍न सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे.

नगर रस्त्यावरील नोवाटेल हॉटेल परिसरामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असल्याने तेथील बीआरटी मार्ग तात्पुरता बंद करुन पीएमपीएल बस मुख्य रस्त्याने पुढे जातात. दरम्यान, संबंधित बीआरटी मार्गामुळेच या रस्त्यावर वाहतुक कोंडी होते, पावसाळ्यात पाण्याला अडथळा ठरतो, अशी कारणे सांगून हा बीआरटी मार्ग काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती.

real role of  municipal commissioner in public transport is clear decision to remove city road BRT
Pune Student Attack: 'माझा काही दोष नसताना त्यानं मला मारलं...' पिडित तरुणीने सांगितली आपबिती

राजकीय नेत्यांनीही हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला होता. या पार्श्‍वभुमीवर महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती तयार करुन प्रत्यक्ष पाहणी व अहवाल देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याबाबतचा अहवाल मात्र पुढे आला नाही.

"पीएमपीएल' प्रशासनाने हा मार्ग बंद करण्यास नापसंती दर्शविली होती. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर नोवाटेल हॉटेलजवळील 200 ते 300 मीटर बीआरटी मार्ग काढला.

दरम्यान, बीआरटी मार्ग काढण्याच्या प्रकाराचा सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर, परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ, पर्यावरण शिक्षण संस्थेच्या संस्कृती मेनन व सार्वजनिक वाहतुक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी महापालिकेच्या या निर्णयाबाबत संयुक्त पत्रक काढून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

real role of  municipal commissioner in public transport is clear decision to remove city road BRT
Pune: सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला; MPSCच्या तरुणांनी वाचवलं

नगर रस्त्यावरील बीआरटीमुळे "पीएमपीएमएल'च्या बस वाहतुक कोंडीत अडकत नव्हत्या. त्यामुळे लाखो प्रवाशांचा वेळ वाचत होता. परिणामी प्रवाशांसाठी हा बीआरटी मार्ग वरदान ठरला होता.

वाढत्या वाहनसंख्येबद्दल वाहनचालकांनीच उठवलेल्या आवाजापुढे महापालिका प्रशासनाने बस प्रवाशांचे हित दुय्यम मानले. कोणत्याही वाहतूक नियोजनकारांचा सल्ला घेतला नाही, पीएमपीचा अभिप्राय देखील डावलून बीआरटी काढल्याचा आरोप केला आहे.

प्रायोगिक तत्वावर ही धुळफेक !

पुणे महानगरपालिका, पीएमआरडीएच्या वाहतूक आराखड्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण 40 ते 45 टक्के नेण्याचे उद्दिष्ट स्पष्ट नमूद आहे. त्याशिवाय पीएमपी सक्षम होऊ शकत नाही. बीआरटी काढण्याचा निर्णय सार्वजनिक वाहतुकीच्या हिताचा नाही हे मनपा आयुक्तांनाही चांगलेच माहीत आहे.

real role of  municipal commissioner in public transport is clear decision to remove city road BRT
Pune Student Attack : 'मी कोयता वरच्या वर पकडला अन्..' वाचवणाऱ्या मुलाने सांगितला घटनेचा थरार

त्यामुळे हा निर्णय "प्रायोगिक तत्वावर' घेतला असे म्हणणे ही निव्वळ धुळफेक आहे. बीआरटी काढून वाहतुक कोंडी कमी कशी होईल?

एकीकडे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बीआरटीची घोषणा करायची आणि दुसरीकडील बीआरटी काढायची, यातुन मनपाचे धरसोडीचे धोरण दिसत असल्याचा आरोप अभ्यंकर, गाडगीळ, मेनन व देशपांडे यांनी केला आहे.

बीआरटीचा काढलेला भाग प्रायोगिक तत्वावर, शुक्रवारी घेणार बैठक - विकास ढाकणे

नगर रस्त्यावरील नोवाटेल हॉटेलजवळील 200 ते 300 मीटरचा बीआरटीचा खराब असलेला, राडारोडा, लोखंडी सांगाडा टाकलेला भाग काढला आहे.

तेवढाच भाग हा प्रयोगिक तत्वावर काढला आहे. येत्या शुक्रवारी मेट्रो, वाहतुक पोलिस व पीएमपीएल प्रशासनाची बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुढील दिशा ठरेल, असे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.