Ganesh festival Traffic Updates in Pune which routes are closed what are optional routes
पुणे, ता. १० : गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते बुधवार (ता. ११) पासून गुरुवार (ता. १८) पर्यंत सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहेत. त्यात लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह इतर रस्त्यांचा समावेश आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे दर्शन तसेच रोषणाई, देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर विसर्जन मिरवणुकीपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते बंद राहतील.
लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), छत्रपती शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक).
सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर पथ ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी, गंज पेठ चौकातून वीर लहूजी वस्ताद तालीम चौक, गावकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट चौकी, कोहिनूर चौक ते बाबाजान चौक, जेधे प्रसाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक.
शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्त्यावरील शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग राहील.
गणेशोत्सवाच्या कालावधीत सायंकाळी पाच वाजल्यानंतर गर्दी संपेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा चौक, कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक, महात्मा गांधी रस्ता या मार्गांवरील एकेरी वाहतूक गरजेनुसार तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.