Pune : कोरोना काळात शाळा बंद असल्याने वाहतूकदार आर्थिक अडचणीत

School bus
School bus sakal
Updated on

पुणे : कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अनेक वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाहतूक होत नसल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न थांबून काही व्यावसायिक कर्जबाजारी झाल्याने आर्थिक मदतीसह विविध मागण्यांसाठी महाराष्‍ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक वाहतूकदार आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाबाबत महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी सांगितले की, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या व्यवसायिकांची आर्थिक अडचण वाढली आहे. कर्जबाजारी झाल्याने आठ व्यावसायिकांनी आत्महत्या केली आहे. आमच्या प्रश्‍नांबाबत शासन सकारात्मक विचार करीत नाही. अद्याप आमची रोजीरोटी देखील सुरू झालेली नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करून दिलासा द्यावा.

School bus
PM मोदींनी १०० कोटी लसीकरणाबद्दल केलेला 'तो' दावा खोटा

महासंघाचे मुख्य सल्लागार हरीश बेकावडे, हुमणे, कार्याध्यक्ष तानाजी बांदल, शहराध्यक्ष गणेश बोराटे, सचिव योगेश सुपेकर, फिरोज शेख, दादासाहेब गवळी, संतोष गोळे, बा. मं. बिराजदार, सोपान घोगरे यांच्यासह विविध शहरांतील पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन झाल्यानंतर महासंघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महासंघाच्या मागण्या :

  • विद्यार्थी वाहतुकदारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे

  • स्कूल व्हॅन व बस परवाना धारकांना आर्थिक मदत द्यावी

  • व्यवसाय बंद असल्याने परिवहन विभागाचा कर माफ करावा

  • बँक व फायनान्सच्या कर्जाची मुदत वाढवून भेटावी

  • कर्जावरील दंड व्याज व व्याज माफ करावे

  • शाळा सुरू होईपर्यंत सर्व दंडात्मक कारवाई थांबवावी

  • मध्यप्रदेशप्रमाणे राज्यातही केवळ सध्या कर भरून वाहनांना परवानगी द्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.