Pune : सिंहगडावरील वाहनतळावर झाडावर वीज पडली

वीजरोधक उपकरण असताना शनिवारी टॉवरच्या शेजारील झाडावर पडली वीज
pune
punesakal
Updated on

खडकवासला - सिंहगडावर असलेल्या वाहनतळावर आज सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस पडत असताना वीज पडली. तर शनिवारी आकाशवाणी दूरदर्शन टॉवरच्या शेजारील झाडावर वीज पडल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिंहगडावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यावेळी वारा नव्हता रिप रिप पाऊस सुरू होता. ढगांचा आवाज सुरू नव्हता. पण अचानक तेथील सुरुच्या झाडावर मोठा आवाज झाला. यावेळी वाहन तळावर असलेले लोक घाबरले. त्या परिसरातून ते पळाले. आणि काही क्षणात झाडाची साल निघाली.

pune
Pune :‘सणासाठी वर्गणी दे, अन्यथा.. ' खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

मागील काही दिवस सुट्ट्या आहेत. तसेच, संध्याकाळी आळस येत असल्याने गडावर जास्त पर्यटक नसतात. आज सोमवार असल्यामुळे तशी गर्दी ही कमी होती. जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही परंतु झाड झाडाची साल निघून गेली आहे.

तसेच, आज सोमवारी दुपारी पाऊस पडत असताना रस्त्यातील उंबरदांड या ठिकाणी घाटात दरड पडली. दरड पडली त्यावेळी कोणतीही वाहने त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे दुर्घटना घडली नाही.या ठिकाणी वन संरक्षण समितीचे सुरक्षा कर्मचारी लहू पवार यांनी रस्त्यातील दगड बाजूला केले.

मी माझी दुपारी पत्नी वैजयंती आम्ही गाडीत बसलो होतो. पूर्वी रेखा खाटपे यांच्या हॉटेल समोर असलेल्या झाडावर विजेच्या कडकडाटाचा मोठा आवाज झाला.

त्यानंतर झाडाची साल निघून पडली. त्याच झाडाखाली आतकरवाडीतील राहुल भाडले त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये बसले होते. आवाज होताच त्यांनी गाडी बाहेर काढली. बाजूला झाले.

-विकास खाटपे, विक्रेते सिंहगड

pune
Mumbai Crime : 'स्पा'च्या आडून सेक्स रॅकेट; चार तरुणींची सुटका

टॉवर लगतच्या झाडावर वीज पडली

आकाशवाणीच्या टॉवर लगतच्या झाडावर शनिवारी रात्रीच्या वेळी वीज पडली. त्यावेळी, त्या ठिकाणी अभियंता व सहायक असे तीन जण रात्रपाळीला होते. आवाज झाल्यानंतर त्यांनी बाहेर पाहिले असता. झाडाची फांदी जळत होती.

त्यानंतर फांदी जळून खाली पडली. त्यांनी तो प्रकार भयानक होता. असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. आकाशवाणीचा 65 मेगावत आणि व दूरदर्शनचा 100 मेगावटचा टॉवर आहे. दोन्ही टॉवरवर वीज प्रतिबंधक उपकरण बसविले आहे. तरी टॉवर लगतच्या झाडावर पडल्याने विजेची क्षमता जास्त होती.

-इंद्रजित बागल, पुणे केंद्र संचालक, दूरदर्शन आणि आकाशवाणी

आकाशवाणीच्या टॉवरवर वीज पडताना आम्ही आमच्या हॉटेलमध्ये होतो. तसेच शनिवारीच फाट्याजवळील कोंढणपूर फाट्याजवळील धारजाई या ठिकाणी मोठा आवाज आणि प्रकाश दिसला. त्या ठिकाणी एका झाडावर वीज पडली असण्याची शक्यता आहे.

-विश्वनाथ मुजुमले, हॉटेल चालक सिंहगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.