पुणे: वेल्हे : पानशेतजवळील कुरण खुर्द येथून एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. ये. देशमुख यांनी हा सोमवारी (ता. 28) हा निकाल दिला.
संजय बबन काटकर (वय ३८) असे फाशी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरण खुर्द येथील एका वस्तीतून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी काटकर याने मुलगी घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले होते. अपहरण बाबत वेल्हे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वेल्हे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान एका रिक्षातून मुलीला पानशेत रस्त्यावरील मालखेड येथे नेले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. शोध मोहीम केल्यानंतर हवेली तालुक्यातील मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील सिमेंटच्या मोरीत (पाईप मध्ये) १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर निष्पन्न झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी आठ पोलिस पथके तैनात केली होती.
दरम्यान संशयित आरोपीचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर तो हा रायगड जिल्ह्यामध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेल्हे पोलिसांचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. भोर मार्गे जाणाऱ्या वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद असल्याने वेल्हे पोलिसांनी दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे गावामध्ये वीटभट्टीवरून आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी केला. तपासात पोलिस हवालदार अजय साळुंखे, औदुंबर आडवाल, सूर्यकांत ओमासे, अजय शिंदे, अभय बर्गे, राहुल काळे, बाळासाहेब गायकवाड , कांतीलाल कोळपे यांनी सहभाग घेतला.
वर्षभरातच सुनावली फाशीची शिक्षा :
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. पाटील यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती. या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. विलास पठारे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.