Pune : मुळशीत अकरा लाख रुपये किंमतीचे दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ जप्त

pune
punesakal
Updated on

पिरंगुट -मुळशी तालुक्यात दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहेत. पिरंगुट (ता.मुळशी) येथील उरवडे रस्त्यावरील एका गोदामामध्ये तयार केलेला सुमारे अकरा लाख रुपयांचा हा भेसळयुक्त खव्यापासून बनविलेला माल तसेच भेसळीचा खवा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

गौरी गणपती सणाच्या ऐन हंगामात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खवा सापडल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सणाच्या दिवसांत बहुतांशी घराघरात पेढे , बर्फी , खवा तसेच खव्यापासून बनविलेली मिठाई व अन्य पदार्थ प्रसाद म्हणून खरेदी केले जातात.

गौरी गणपतीच्या या दहा ते अकरा दिवसांत कोट्यवधी रुपयांची खरेदी केली जाते. मात्र भेसळयुक्त खव्यापासून तयार झालेले पदार्थ खाल्ल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यापूर्वीही कित्येकवेळा हा भेसळयुक्त खवा तसेच त्यापासून बनविलेले पदार्थ पिरंगुट , घोटावडे फाटा , भूगाव , भुकूम तसेच मुळशीतील विविध दुकानांत विक्रीसाठी ठेवलेले होते. याशिवाय आत्ता जप्त केलेला मालही परिसरातील मिठाईंच्या विविध दुकानांत विकला जाणार होता.

pune
Pune Water Supply : पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित व्हॉल्व्ह; पुणे शहरात सुमारे ३०० व्हॉल्व्ह बसविण्यात येणार

याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , काल मंगळवार दिनांक १२ रोजी रोजी पिरंगुट येथील उरवडे रस्त्यावरील कोकाकोला कंपनी परिसरात एक गोदाम आहे. या गोदामात कृष्णा फुड्स यांच्यावतीने खवा , बर्फी , मिठाई तसेच अन्य पदार्थ बनविले जातात.

या ठिकाणी भेसळयुक्त खवा व बर्फी बनवली जात असल्याने तेथील गोदामावर पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त छापा टाकून अन्न अस्थापनेची तपासणी केली. त्यात बर्फी,स्कीम मिल्क पावडर,वनस्पती व पाम तेल असा एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे २ टन तयार बर्फी हा नाशवंत अन्न पदार्थ असल्याने तो जागेवरच नष्ट करण्यात आला.

कृष्णा फुड्समधील उत्पादनांची अधिक तपासणी केली असता तेथील आस्थापनेत त्रुटीं आढळल्याने अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कृष्णा फुड्स उत्पादक तेजाराम गणेशराम चौधरी (वय ४०) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले व पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखील सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस हवालदार रॅाकी देवकाते, पोलिस नाईक सिद्धेश पाटील, पोलिस कॉं स्टेबल साहिल शेख तसेच पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड , सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

pune
R. Madhavan: अभिनेता आर माधवन यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे म्हणाले , पिरंगुट येथील कृष्णा फुड्स उत्पादकावर उत्पादन बंद करण्याची प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे. छापा टाकला त्यावेळी तेथील पदार्थ तयार करण्याच्या परिसरात घाण व दुर्गंधी आढळली. आरोग्याला घातक वातावरण आढळले. अनेक उत्पादनावर लेबल लावलेले नव्हते.

त्यामुळे तेथील गोदामालगतच जेसीबीच्या साह्याने खड्डा घेऊन सुमारे दोन टन बर्फी गाडून नष्ट करण्यात आली. दुधापासून बनविलेली ६७५०० रुपये किंमतीची ४५० किलो बर्फी , ९० हजार रुपये किंमतीचे ७५० किलो पाम तेल , १ लाख ६ हजार रुपये किंमतीचे ७५० किलो वनस्पती तेल तसेच ८ लाख १० हजार रुपये किंमतीची साडे चार हजार किलो स्किम मिल्क पावडर आदी जप्त केले आहे. तेथील सर्व उत्पादनांचे नमुने घेतले असून पुढील तपासणीसाठी पाठिवलेले आहेत. त्याचा अहवाल आला की पुढील कारवाई केली जाणार आहे.

pune
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

अशा बनावट , भेसळयुक्त तसेच आरोग्याला घातक ठरणाऱ्या उत्पादनाची निर्मिती कुठे होत असेल तर नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्री क्रमांक पुढीलप्रमाणे - १८००२२२३६५ .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.