Pune : शिवराज्याभिषेक दिनाची अनोखी मानवंदना, सिंहगडावर '३५० वेळा सिंहगड चढणे' उपक्रमात ४३० जणांच्या सहभागाची नोंद

नुकेतच एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या लहू उघडे(सिंहगड), सुविधा कडलग(पुणे), एव्हरेस्टवीर भगवान चवले यांचा सत्कार केला.
Pune
Punesakal
Updated on

Pune - खडकवासला, भल्या पहाटे गार वाऱ्यात,.. आतकरवाडी येथील भातखळ्याचे मैदानावर… तुतारीच्या निनादात… आठ वर्षाच्या मुलापासून ८१ वर्षाच्या आजोबांसह सुमारे ४३० जणांनी आज रविवारी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत '३५० वेळा सिंहगड चढणे' उपक्रमात सहभाग घेत शिवराज्याभिषेक दिनाला अनोखी मानवंदना दिली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त '३५० वेळा सिंहगड चढणे' हा अभिनव उपक्रम सिंहगड परिवार फाऊंडेशनच्या वतीने आज रविवारी राबविला. सिंहगड परिवार फाऊंडेशन (SPF) आणि वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन (WGRF) यांच्या वतीने आयोजित केला होता.

या उपक्रमात कुणी दोन, तर कुणी तीन वेळा, सिंहगड सर करत सर्वांनी मिळून तीनशे पन्नास पेक्षा अधिक वेळा सिंहगड सर करून तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाला अनोखी मानवंदना दिली.

Pune
Mumbai Crime : काकाकडून पुतण्याच अपहरण! मुलाची बंगालमधून सुटका

सिंहगडावर पायी जाण्यासाठी पायथ्याला असलेल्या आतकरवाडी मार्गे पायवाट आहे. या रस्त्याच्या सुरवातीला भातखळ्याच्या मैदानावर तुतारीच्या निनादात आणि रांगोळीच्या पायघड्यांनी स्वागत केले. उपक्रमाची सुरुवात आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळा प्रतिमेचे पूजन करून व भगवा ध्वज फडकावून केली.

Pune
Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

यावेळी माजी सभापती पूजा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, आग्रावीर मारुती गोळे, सिंहगडचे संशोधक डॉ. नंदकिशोर मते हे उपस्थित होते.

नुकेतच एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या लहू उघडे(सिंहगड), सुविधा कडलग(पुणे), एव्हरेस्टवीर भगवान चवले यांचा सत्कार केला. ‘इंटरनॅशनल ट्रेल रन’ संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दिग्विजय जेधे यांचा सत्कार केला. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ॲाफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात येणार आहे. असे अँड.प्रकाश केदारी यांनी माहिती दिली.

Pune
Mumbai News : 'मरे'वर महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना; ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

बीपी आणि डायबेटीस मुक्त भारत होण्यासाठी अशा आरोग्यदायी उपक्रमांची आवश्यकता आहे. असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त करीत उपक्रमास शुभेच्छा देत त्यांनी

पायी सिंहगड सर केला. दुर्ग अभ्यासक मारुती आबा गोळे यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर सिंहगडाचे अभ्यासक डॉ नंदकिशोर मते यांनी प्रास्तविक करून एव्हरेस्ट विरांची यशोगाथा सांगितली.

सूत्रसंचालन योगिता मराठे, राजू दारकुंडे यांनी केले. उपक्रमाचे आयोजन सिंहगड परिवारच्या वतीने ॲड.प्रकाश केदारी, किरणकुमार पाटील, निलेश मिसाळ, नम्रता डांगरे यांनी केले होते.

Pune
Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

८ ते ८१ वर्षाच्या तरुणांचा सहभाग

'३५० वेळा सिंहगड चढणे' यामध्ये अनुज वय ८ व रुद्रनिल रविंद्र देशमुख (वय १३ ) दोघे कमी वयाचे बंधू सहभाग होता. तर ८१ वर्षाचे विकास करवंदे, ७६ वर्षाचे जुगल राठी, ७४ वर्षाच्या सुनीता नाडगिर या ज्येष्ठ तरुणांचा व्यक्तींचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.