पुणे विद्यापीठाची ‘पेट परीक्षा’ आता पाच सप्टेंबर रोजी

विद्यापीठ प्रशासनाने अशी माहिती दिली आहे
SPPU
SPPUsakal
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (SPPU) पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले असून प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘पेट परीक्षा’ आता पाच सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

विद्यापीठाने यापुर्वी जाहीर केल्यानुसार ही परीक्षा २२ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा पाच सप्टेंबरला होणार आहे. विद्यापीठात पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून काही विद्यार्थ्यांना आपल्या विषयासाठी गाईड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पीएच.डी. प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

SPPU
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी सोडत; वाचा सविस्तर

पुणे विद्यापीठातील विविध विभागातील आणि पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी ऑॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. परंतु, ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे पेट परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.