Pune University : विद्यापीठ चौकाला दिलासा! पोलिसांकडून वाहतुकीत बदल, विद्यापीठात मिलेनियम गेटमधून प्रवेश

मेट्रोच्या बांधकामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा ऐवजी मिलेनियम गेटचा (चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन) वापर.
Pune University Chowk
Pune University ChowkSakal
Updated on

पुणे - मेट्रोच्या बांधकामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून, वाहतूक पोलिसांच्या वतीने काही नवे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा ऐवजी मिलेनियम गेटचा (चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन) वापर सुचविण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपासूनच या नव्या बदलांची अंमलबजावणी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील वळण अडथळे लावून बंद करण्यात आले. तसेच बाणेर रस्त्यावरील हाय स्ट्रीटपासून ते विद्यापीठापर्यंतच्या भागात मॅट्रोने बॅरिकेट्स आत ओढून घेतल्यामुळे वाहतुकीसाठी अधिकची मोकळी जागा मिळाली.

तसेच औंधकडून शिवाजीनगरकडे येणारी जड वाहतूक ब्रेमेन चौकातूनच वळविण्यात आल्यानेही काहीसा फरक जाणवला. शनिवारी खासगी अस्थापनांसह काही सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने तुलनेने वाहतूक कमी होती. तरीही थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडीबाबत दिलासा मिळाल्याचे दिसले.

मात्र, मेट्रोचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत येथील वाहतूक कोंडी टाळणे किंवा कमी करणे पोलिसांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे. तसेच वाहन चालकांच्या सहशिलतेची परीक्षा पुढील काळात होईल.

पर्यायी मार्गाचा अभाव...

शिवाजीनगरकडून बाणेर, औंध, बालेवाडी, बावधन, पिंपळे गुरव अथवा सांगवी आदी भागात जाण्यासाठी किंवा तिकडून शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे विद्यापीठ चौकातून जाणे हाच एक पर्याय वाहन चालकांसाठी आहे. पूर्वी मोठाले पूल असतानाही येथे वाहतूक कोंडी होत होती.

आता तर मेट्रोच्या कामामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. वाहतूक पोलिसांनी कितीही बदल केले तर येणाऱ्या वाहनांची संख्या आणि उपलब्ध रस्ता पाहता ही कोंडी फोडणे अशक्यच आहे. शहरात पर्यायी किंवा समांतर रस्ते नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

तसेच वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केवळ वाहतूक पोलिसांवर अवलंबून न राहता महापालिकेने कायमस्वरूपी उपायांसाठी पर्यायी मार्गांची निर्मिती करण्याचे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.