तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुणे विद्यापीठातील वसतिगृहे सुरू

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणही झाले आहे, अशी माहिती वसतीगृह प्रमुख डॉ. सचिन बल्लाळ यांनी दिली.
pune university hostel
pune university hostelSakal
Updated on

पुणे : तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे सोमवारी (ता.२१) सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील पीएच.डी.आणि स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठीची चार वसतिगृहांची तयारी पूर्ण झाली असून, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणही झाले आहे, अशी माहिती वसतीगृह प्रमुख डॉ. सचिन बल्लाळ यांनी दिली. (Pune University Hostel Start)

राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर आता विद्यापीठातील वसतिगृहे टप्प्याटप्याने खुली करण्यात येत आहे. सर्वात प्रथम पीएच.डी.आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होत आहे. इतर वसतीगृहांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. डॉ. बल्लाळ म्हणाले,‘‘विद्यापीठातील वसतीगृहांचा डोलारा खूप मोठा आहे. लॉकडाउनच्या काळात वेळोवेळी वसतिगृहाचा रखरखाव करण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष विद्यार्थी राहण्यासाठी येत असून, स्वच्छतागृहे आणि इलेक्ट्रिसिटीही कामेही आता पूर्ण झाली आहे.’’

pune university hostel
हिम्मत करो, जिने को एक उमर पडी है...

शिष्यवृत्ती नसल्यामुळे विद्यापीठाबाहेरच खोली घेऊन राहावे लागत आहे. आता वसतिगृहे सुरू झाल्यामुळे आर्थिक खर्च वाचेल, त्याचबरोबर संशोधनासाठी अधिकचा वेळ देणे शक्य होणार आहे. लॉकडाउनमुळे आधीच कामाला उशीर झाला आहे. आता त्याला अधिक गती मिळेल. वसतीगृहाबरोबरच इतर सुविधाही सुरू झाल्यास सर्वांनाच फायदा होणार आहे.

- राजेंद्र सोनवणे, पीएच.डी. विद्यार्थी

विद्यार्थ्यांसाठी सूचना ः

- पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी खोली उघडल्यावर वसतीगृह कार्यालयाला कळवावे

- मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, सोबत बाळगावा

- आजारी असल्यास रेक्टर अथवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा

सोमवारी उघडणारी वसतिगृहे

  • मुलांचे वसतिगृहे ः क्रमांक ५ आणि ९

  • मुलींचे वसतिगृहे ः क्रमांक ४ आणि ८

  • अंदाजे विद्यार्थ्यांची संख्या ः ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.