Pune University : पुणे विद्यापीठाने रोवली आंतरविद्याशाखीय शिक्षणाची मुहूर्तमेढ

नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधीच आंतरविद्याशाखीय शिक्षणाचा अभ्यासक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील विद्यापीठ ठरले आहे.
Savitribai phule pune university
Savitribai phule pune universitysakal
Updated on
Summary

नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधीच आंतरविद्याशाखीय शिक्षणाचा अभ्यासक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील विद्यापीठ ठरले आहे.

पुणे - नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधीच आंतरविद्याशाखीय शिक्षणाचा अभ्यासक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील विद्यापीठ ठरले आहे. आजमितीस जवळपास अडीचशे विद्यार्थ्यानी अशी आंतरविद्याशाखीय पदवी प्राप्त केली असून, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सामंजस्य करार करीत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आंतरविद्याशाखीय विज्ञान प्रशालेचे विभागप्रमुख डॉ. अविनाश कुंभार म्हणाले, ‘विद्यापीठातील विज्ञान प्रशालेची (आयडीएसएस) स्थापना २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात झाली. विज्ञान प्रशाले अंतर्गत मागील तीन वर्षात सहा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातील मेलबर्न सोबतच्या करारात आपण युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲकॅडमी विद्यापीठात स्थापन केली आहे. या अंतर्गत विद्यापीठातील १७ जणांच्या गटाने मेलबर्न विद्यापीठात आयोजित परिषदेत सहभागी झाला होता. या कराराच्या माध्यमातून अत्यंत महाग असणारे शिक्षण परवडणाऱ्या दरात देणे, विज्ञान आणि अन्य विषयातील संधींचा विस्तार करणे,परदेशी शिक्षणाच्या संधी देणे हा आमचा प्रयत्न आहे.’

प्रशालेचे कौशल्याभिमूख करार -

१) सॉइल टेक कंपनी - या माध्यमातून मोठे रस्ते, बोगदे, पूल अशा महत्त्वाच्या प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामध्ये सहा विद्यार्थी हे सखोल संशोधन करत आहेत.

२) गुन्हे अन्वेषण विभाग - याद्वारे गुन्हेगारांची रेखाचित्र हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

३) इतर करार - संचेती हेल्थकेअर, जेम्स अँड ज्वेलरी यांच्यासोबत करार करत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

द्विलक्षी अभ्यासक्रम -

आंतरविद्याशाखीय प्रशालेत कोणत्याही विद्याशाखेतील कोणताही विषय घेत विद्यार्थी त्यांची पदवी पूर्ण करू शकतात. या प्रशालेच्या माध्यमातून पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भूशास्त्र या विषयांमध्ये ‘बीएससी ब्लेंडेड’ हा व्दिलक्षी अभ्यासक्रम करता येतो. तर ‘बीए लिबरल आर्ट्स’ या पदवीच्या माध्यमातून मानसशास्त्र, अर्थशास्त्र यापासून ते माध्यम शिक्षणापर्यंत मेकिंगपासून अनेक विषय घेत पदवी घेण्याची संधी आहे. याखेरीज जे विद्यार्थी पारंपरिक पदवी घेत आहेत त्यांनाही या प्रशालेच्या माध्यमातून विषय निवडत पदवी घेण्याची संधी उपलब्ध असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.