पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमाची नोंद केली आहे. ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमांतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या अभिनव मोहिमेची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या मोहिमेत तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ युवक व नागरिकांचे सेल्फी ग्राह्य धरण्यात आले आहेत.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी यावेळी उपस्थित होते. चीनने डिसेंबर २०१६ मध्ये असा विक्रम केला होता. यामध्ये १ लाख २४ हजार ४६० सेल्फीची नोंद झाली होती. त्यानंतर सात वर्षांनंतर हा विक्रम मोडीत निघाला आहे. विद्यापीठाने मागील पाच वर्षांत केलेला हा तिसरा विश्वविक्रम ठरला आहे.
२५ लाख नागरिकांचा सहभाग
‘सेल्फी विथ मेरी माटी’ ही अभिनव मोहीम राज्यभरात राबविण्यात आली. याअंतर्गत राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल २५ लाखांहून युवकांनी, नागरिकांनी याला प्रतिसाद देत सेल्फी अपलोड केले. यापैकी १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फी ग्राह्य धरत त्याची नोंद गिनीस बुकमध्ये करण्यात आली आहे. गिनीस बुकचे भारतातील प्रतिनिधी ऋषीनाथ यांनी हा विश्वविक्रम झाल्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते राजेश पांडे यांनी विश्वविक्रम प्रमाणपत्र स्वीकारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.