Pune University : विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मिळेना मुहूर्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक भरतीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. मात्र, पुन्हा एकदा आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध केले जाईल, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे.
savitiribai phule pune university
savitiribai phule pune universitysakal
Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक भरतीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. मात्र, पुन्हा एकदा आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध केले जाईल, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. या पूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले होते. आता त्यात पुन्हा एकदा नव्या तारखेची भर पडली आहे.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ३८४ पैकी २१५ पदे रिक्त आहेत. मागील १२ वर्षांपासून विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडली असून अनेक विभागांत प्राध्यापकांची संख्या आता एकवर आली आहे. तर काही विभाग प्राध्यापकांअभावी बंद करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला शासन दरबारी ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने शैक्षणिक नुकसानीबरोबरच विद्यापीठाच्या नावलौकीकावरही दूरगामी परिणाम होत आहे. आता आठवडाभराचे दिलेले आश्वासन तरी पूर्ण होवोत, हीच अपेक्षा आहे.

मूल्यांकन प्राध्यापक भरतीनंतर -

प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे विद्यापीठाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठा फटका सहन करावा लागत आहे. विद्यापीठासमोर नॅक मूल्यांकन टिकविण्याचे व वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. कमी झालेले मनुष्यबळ आणि संशोधनात झालेली घसरण ही विद्यापीठांसाठी डोके दुखी ठरत आहे.

त्यामुळे विद्यापीठातील विविध विभागातील रिक्त पदांची भरती केल्याशिवाय नॅक मूल्यांकनाला सामोरे जायचे नाही,असा विचार वरिष्ठ स्तरावरील अधिकारी करत आहेत. परिणामी विद्यापीठाची रखडलेली १११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाला लवकरच नॅक पुनर्मुल्यांकनाला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने विविध पातळ्यांवर कामाला सुरूवात केली आहे. अॅकॅडमिक ऑडिट, फायर ऑडिट, ट्रीपल ‘ए’चे ऑडिट आदी कामे झाली असून त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच विद्यापीठाकडून प्रथमतः आयआयक्यूए तयार केला जात आहे. दरम्यानच्या काळात नॅकसाठी सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करून ठेवला जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

विद्यापीठाची स्थिती -

- पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर विद्यापीठातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे

- पुणे विद्यापीठात सुमारे ५० टक्के विभाग प्रमुख पदाचा भार हा अतिरिक्त स्वरूपात दिला आहे

- विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापकांची भरती केली आहे

- नॅक मूल्यांकनात उपलब्ध मनुष्यबळाला गुण आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरल्याशिवाय विद्यापीठ नॅक मूल्यांकनाला सामोरे जाणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.